रतनलाल प्लाॅट चाैकातील दुकानांमध्ये शिरले नाल्याचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:24 AM2021-09-08T04:24:26+5:302021-09-08T04:24:26+5:30
मनपाच्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांमुळे नाले सफाईचा पुरता बाेजवारा उडाला आहे. नाले सफाईसाठी दरवर्षी झाेन निहाय निविदा काढल्या जात असताना ...
मनपाच्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांमुळे नाले सफाईचा पुरता बाेजवारा उडाला आहे. नाले सफाईसाठी दरवर्षी झाेन निहाय निविदा काढल्या जात असताना यंदा संपूर्ण शहरातील नाले सफाईसाठी एकच निविदा प्रसिद्ध करण्यात आली हाेती. मर्जितील कंत्राटदाराला काम मिळावे,यासाठी खटाटाेप करण्यात आला. याप्रकरणी आयुक्तांची ही दिशाभूल केल्याचे कालांतराने समाेर आले. दरम्यान, साेमवारी रात्री मुसळधार पावसामुळे शहराच्या विविध भागात तळमजल्यातील दुकानांमध्ये नाल्यांमधील घाण पाणी शिरले. रतनलाल प्लाॅट चाैकातील नाल्याचे बांधकाम याेग्यरीत्या न केल्यामुळे तसेच नाले सफाईकडे पाठ फिरवल्याने दुकानांमध्ये पाणी शिरल्याचे मंगळवारी सकाळी दिसून आले. यामुळे दुकानांमधील साहित्य ओले झाले.
मनपाने नाल्याची साफसफाई करावी !
रतनलाल प्लाॅट चाैकातील नाल्याची साफसफाई न केल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा झालाच नाही. नाल्यातील घाण पाणी छाया हॅण्डलूमसह इतर दुकानांमध्ये शिरल्याने व्यावसायिकांना माेठा आर्थिक फटका बसला आहे. मनपाने नाल्याची त्वरित साफसफाई करावी,अशी मागणी व्यावसायिक सुनील लालवाणी यांनी केली आहे.