वऱ्हाडातील जलसाठा स्थिरावला ६३ टक्क्यांवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:40 PM2018-09-26T12:40:29+5:302018-09-26T12:42:38+5:30

अकोला : वऱ्हाडातील पाच जिल्ह्यांत धरणातील साठा ६३.४८ टक्क्यांवरच स्थिरावला आहे. पावसाचा आठवडा शिल्लक असताना अमरावती जिल्ह्यात सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणात ५१.७५ टक्के, तर बुलडाणा जिल्ह्यातील धरणांची स्थिती दयनीय आहे.

Water storage of dams in vidarbha stays at 63 percent! | वऱ्हाडातील जलसाठा स्थिरावला ६३ टक्क्यांवर!

वऱ्हाडातील जलसाठा स्थिरावला ६३ टक्क्यांवर!

Next
ठळक मुद्देअकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांत नऊ मोठे, २४ मध्यम व ४६६ लघू प्रकल्प आहेत. अकोला शहराची जीवनवाहिनी असलेल्या काटेपूर्णा या मोठ्या धरणात ९४.२६ टक्के जलसाठा संकलित झाला आहे.

अकोला : वऱ्हाडातील पाच जिल्ह्यांत धरणातील साठा ६३.४८ टक्क्यांवरच स्थिरावला आहे. पावसाचा आठवडा शिल्लक असताना अमरावती जिल्ह्यात सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणात ५१.७५ टक्के, तर बुलडाणा जिल्ह्यातील धरणांची स्थिती दयनीय आहे. खडकपूर्णा हे मोठे धरण कोरडेच आहे.
वºहाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांत नऊ मोठे, २४ मध्यम व ४६६ लघू प्रकल्प आहेत. या सर्व धरणांमध्ये २५ सप्टेंबर रोजी ६३.४८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणामधील जलसाठा शून्य टक्केच आहे. अकोला शहराची जीवनवाहिनी असलेल्या काटेपूर्णा या मोठ्या धरणात ९४.२६ टक्के जलसाठा संकलित झाला आहे. याच जिल्ह्यातील निर्गुणा मध्यम धरणात १०० टक्के जलसाठा संकलित झाला असून, उमा १००, मोर्णा धरणात ५२.४१ टक्के, तर वान धरणात ९५.३० टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील कोराडी मध्यम धरणातील जलसाठा ८.९३ टक्के आहे. तोरणा १४.७०, तर उतावळी धरणातील पातळी ३५.८३ टक्के झाली आहे. याच जिल्ह्यातील नळगंगा या मोठ्या धरणात १८.३६ टक्के, पेनटाकळी धरणात १९.३८ टक्के, ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात १९.७२ टक्के, पलढगमध्ये ३१.८२ टक्के, मन धरणात २५.९८ टक्के, तर मसमध्ये केवळ ३.०६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ९४.८१ टक्के, एकबुर्जी व सोनल धरणात १०० टक्के जलसाठा आहे.
अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणात ५१.७५ टक्के, यवतमाळ जिल्ह्यातील पूसमध्ये १००, अरुणावती ९५.२८ तर बेंबळा धरणात ६२.०२ टक्केच जलसाठा आहे.

 

Web Title: Water storage of dams in vidarbha stays at 63 percent!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.