वऱ्हाडातील जलसाठा पाच टक्क्यांनी घटला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 02:50 PM2018-11-09T14:50:06+5:302018-11-09T14:50:18+5:30

अकोला : वऱ्हाडातील पाच जिल्ह्यांत धरणातील साठ्यात गत एका महिन्यात पाच टक्के घट झाली असून, आजमितीस ५८.१९ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

water storage decreased by 5 percent | वऱ्हाडातील जलसाठा पाच टक्क्यांनी घटला!

वऱ्हाडातील जलसाठा पाच टक्क्यांनी घटला!

Next

अकोला : वऱ्हाडातील पाच जिल्ह्यांत धरणातील साठ्यात गत एका महिन्यात पाच टक्के घट झाली असून, आजमितीस ५८.१९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अमरावती जिल्ह्यात सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणात ५१.७५ टक्के जलसाठा होता. तो आजमितीस ४२.५७ टक्के तर बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा व मस दोन्ही धरणातील जलसाठा शून्य आहे.
वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांत नऊ मोठे, २४ मध्यम व ४६६ लघू प्रकल्प आहेत. या सर्व धरणांमध्ये २५ सप्टेंबर रोजी ६३.४८ टक्के जलसाठा संचयित झाला होता. गत सव्वा महिन्यात या साठ्यात घट झाली असून, आजमितीस ५८.९५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणामधील जलसाठा यावर्षी सुरुवातीपासूनच शून्य टक्के आहे. अकोला शहराची जीवनवाहिनी असलेल्या काटेपूर्णा या मोठ्या धरणात ९४.२६ टक्के जलसाठा संकलित झाला होता. हा साठा आता ८७. ६१ टक्के आहे. याच जिल्ह्यातील निर्गुणा मध्यम धरणात १०० टक्के साठा होता आता ९६.९८ असून, उमा १०० हून ९७ टक्के तर मोर्णा धरणात ५१.०६ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. वान धरणात ९५.२५ टक्के जलसाठा आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील मस धरणात शून्य साठा असून, कोराडी मध्यम धरणातील जलसाठा केवळ ५.३६ टक्के आहे. तोरणा १२.८०, उतावळी धरणातील पातळी ४०.४२ टक्के आहे. याच जिल्ह्यातील नळगंगा या मोठ्या धरणात १६.०८ टक्के, पेनटाकळी धरणात १४.४७ टक्के, ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात १८.७७ टक्के, पलढगमध्ये ३०.७६ टक्के, मन धरणात २३.७० टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ८८.६८ टक्के, एकबुर्जी ८१.१४ तर सोनल धरणात ९८.८८ टक्के जलसाठा आहे.
अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणात ४२.५७ टक्के, यवतमाळ जिल्ह्यातील पूसमध्ये ९७.९९, अरुणावती ८४.०७ तर बेंबळा धरणातील जलसाठा ६२.०२ टक्क्यांवरू न ५२.७२ टक्के घटला आहे.

 

Web Title: water storage decreased by 5 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.