महान धरणाचा जलसाठा प्रथमच १०० टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 11:09 AM2020-09-23T11:09:45+5:302020-09-23T11:09:56+5:30
जिल्ह्यात सर्वात मोठे १० वक्रद्वाराच्या महान धरणाचा जलसाठा प्रथमच १०० टक्क्यांवर पोहोचला आहे.
महान : महान धरणातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. यावर्षी दमदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच लहान-मोठी धरणे व लघु तलाव तुडुंब भरले आहेत. जिल्ह्यात सर्वात मोठे १० वक्रद्वाराच्या महान धरणाचा जलसाठा प्रथमच १०० टक्क्यांवर पोहोचला आहे.
१ आॅगस्ट ते २१ सप्टेंबरदरम्यान महान धरणाचे १४ वेळा वक्रद्वार उघडून अतिरिक्त पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला आहे. सर्वप्रथम धरणाचे वक्रद्वार १ आॅगस्ट, १२ आॅगस्ट, १४ आॅगस्ट, १७ आॅगस्ट, २१ आॅगस्ट, २८ आॅगस्ट, ४ सप्टेंबर, ९ सप्टेंबर, १० सप्टेंबर रोजी दोन वेळा, १३ सप्टेंबर, १७ सप्टेंबर, १७ सप्टेंबर, २० सप्टेंबर आणि २१ सप्टेंबर म्हणजे आॅगस्ट महिन्यात सहा वेळा आणि सप्टेंबर महिन्यात आठ वेळा असे एकूण १४ वेळा महान धरणाचे वक्रद्वार उघडण्यात आले होते. या १४ वेळेस उघडलेल्या वक्रद्वारामधून नदीपात्रात १२१.६८४ दलघमी म्हणजे १४०.०९१ टक्के पाण्याचा विसर्ग झाला आहे. धरणात उपलब्ध असलेल्या १०० टक्के जलसाठा आणि नदीपात्रात विसर्ग झालेला १४०.०९१ टक्के हा आश्चर्यजनक आकडा महान धरणाने पार केला आहे. महान धरणातून यावर्षी १४०.०९१ टक्के एवढ्या पाण्याचा विसर्ग झाला. महान धरण पाणलोट क्षेत्रात हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू असल्याने पंधराव्यांदा लवकरच धरणाचे वक्रद्वार उघडण्याची चिन्हे दिसत आहेत.