खारपाणपट्ट्यातील ६० गावांना १५ जुलपर्यंत टँकरद्वारे पाणी पुरवठा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 01:15 PM2018-07-04T13:15:07+5:302018-07-04T13:16:37+5:30
अकोला : खारपाणपट्ट्यातील खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ६० गावांना गत सप्टेंबरपासून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
अकोला : खारपाणपट्ट्यातील खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ६० गावांना गत सप्टेंबरपासून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पावसाळा सुरू झाला असला तरी, टंचाईग्रस्त या गावांना १५ जुलैपर्यंत टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी दिला.
खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ६० गावांना गत सप्टेंबरपासून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पावसाळा सुरू झाल्याच्या पृष्ठभूमीवर टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची मुदत ३० जून रोजी संपुष्टात आली आहे.; मात्र गावांना नळ योजनेद्वारे पाणी पुरवठा सुरू नसल्याच्या स्थितीत पाणीटंचाईग्रस्त ६० गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू ठेवण्यात यावा, असा प्रस्ताव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांमार्फत जिल्हाधिकाºयांकडे सादर करण्यात आला होता. त्यानुषंगाने ६० गावांना १५ जुलैपर्यंत टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी ३ जुलै रोजी दिला.