अकोला शहराला तीन दिवस पाणीपुरवठा बंद

By admin | Published: May 18, 2014 12:59 AM2014-05-18T00:59:24+5:302014-05-18T00:59:42+5:30

महान येथून शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी शनिवारी कान्हेरी सरप गावानजिक फुटली. जलवाहिनी दुरुस्तीला किमान तीन दिवसांचा अवधी

Water supply to Akola for three days | अकोला शहराला तीन दिवस पाणीपुरवठा बंद

अकोला शहराला तीन दिवस पाणीपुरवठा बंद

Next

अकोला : महान येथून अकोला शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी शनिवारी कान्हेरी सरप गावानजिक फुटली. जलवाहिनी दुरुस्तीला किमान तीन दिवसांचा अवधी लागणार असल्याने संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद होणार आहे. वारंवार पाणीपुरवठय़ाचे वेळापत्रक कोलमडत असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, दीड महिन्यात दुसर्‍यांदा जलवाहिनी फुटल्याने अकोलेकरांवर जलसंकट ओढवले आहे. एप्रिल महिन्यात महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील तीनपैकी एक पम्पिंग मशीन जळण्यासह आळंदा गावानजिक मुख्य पाईपलाईन फुटली होती. जलप्रदाय विभागातील अधिकार्‍यांनी पाण्याचे संकट लक्षात घेता, एका आठवड्यात जलवाहिनी दुरुस्तीसह पम्पिंग मशीन दुरुस्त केली होती; परंतु त्यामुळे संपूर्ण शहराचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते. अशास्थितीत शनिवारी दुसर्‍यांदा मुख्य जलवाहिनी फुटली. कान्हेरी सरप गावानजिक मुख्य जलवाहिनीमधील रिंग व रबर पाण्याच्या ह्यप्रेशरह्णमुळे निसटल्याची माहिती आहे. यामुळे सुरुवातीला महान येथून पाण्याचा उपसा बंद करण्यात आला. ऐन उन्हाळ्य़ात पाण्याची भीषण स्थिती लक्षात घेता, तात्काळ खोदकामाला सुरुवात करण्यात आली आहे. दुरुस्तीला किमान तीन दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. परिणामी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा तीन दिवसांकरिता ठप्प होईल.

Web Title: Water supply to Akola for three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.