आगरसह परिसरातील पाणीपुरवठा ठप्प; ग्रामस्थांना हिवाळ्यात घ्यावे लागते पाणी विकत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:18 AM2020-12-24T04:18:06+5:302020-12-24T04:18:06+5:30

आगर परिसरातील नवथळ, खेकडी, पाळोदी, कंचनपूर, बादलापूर आदी गावांना दर आठवड्यातून एकदा खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणीपुरवठा केला जातो. ...

Water supply in the area including Agar; The villagers have to buy water in winter | आगरसह परिसरातील पाणीपुरवठा ठप्प; ग्रामस्थांना हिवाळ्यात घ्यावे लागते पाणी विकत

आगरसह परिसरातील पाणीपुरवठा ठप्प; ग्रामस्थांना हिवाळ्यात घ्यावे लागते पाणी विकत

googlenewsNext

आगर परिसरातील नवथळ, खेकडी, पाळोदी, कंचनपूर, बादलापूर आदी गावांना दर आठवड्यातून एकदा खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणीपुरवठा केला जातो. मात्र गेल्या महिन्याभरापासून पाणीपुरवठा योजनेच बंद असल्याने ग्रामस्थांची भटकंती होत आहे. ग्रामस्थांनी अनेकदा ग्रामपंचायत विभागाशी संपर्क साधून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली; मात्र याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. परिसरात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने नेते यामध्ये व्यस्त आहेत. दुसरीकडे, नागरिक पाण्यासाठी भटकंती करीत असल्याचे चित्र आहे.

पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत असल्याने ग्रामस्थांना आर्थिक भुर्दंड

गावात पाणीपुरवठा ठप्प असल्याने ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. तसेच ग्रामस्थांना दररोज खासगी टँकरमधून पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याकडे पाणीपुरवठा विभागाने लक्ष देऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.

फोटो : आगर गावातील रिकामे जलकुंभ.

Web Title: Water supply in the area including Agar; The villagers have to buy water in winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.