मूर्तिजापूर शहराला उमा धरणातून पाणीपुरवठा
By admin | Published: November 23, 2014 01:21 AM2014-11-23T01:21:05+5:302014-11-23T01:21:05+5:30
पाणी प्रश्न निकाली काढण्यात राजकारण येऊ देणार नाही - आ. पिंपळे यांचे आश्वासन.
मूर्तिजापूर: शहराला आता महान धरणाऐवजी उमा (खांदला) धरणातून नियमितपणे पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष पवन अशोक अव्वलवार यांनी शनिवारी येथील पत्र परिषदेत दिली. शहराचा पाणी प्रश्न निकाली काढण्यात राजकारण आडवे येऊ देणार नसल्याचे आमदार हरीश पिंपळे यांनी सांगितले.
मूर्तिजापूर शहराला महान येथील काटेपूर्णा प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. तथापि, यावर्षी महान धरणातून जलसाठा घटल्यामुळे मू िर्तजापूर शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. दरम्यान, उमा धरणातील जलसाठा सिंचनासाठी राखीव असल्याने त्यातून मूर्तिजा पूर शहरासाठी पिण्याचे पाणी मिळत नव्हते. त्यामुळे मूर्तिजापूर शहरात पाणी टंचाई निर्माण झाल्याच्या पृष्ठभूमीवर जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी नगर परिषदेला १२ लाख ५२ हजार ८५ रुपयांचा धनादेश देण्याचे आदेश दिले. सदर धनादेश नगराध्यक्ष पवन अव्वलवार यांनी उमा प्रकल्पाच्या अधिकार्यांना प्रदान केला. त्यानुसार आता उमा धरणातून पाणी मिळण्यास सुरुवात झाली आहे. मूर्तिजापूर शहरातील पाणी समस्या निकाली काढण्यासाठी नगर परिषदेने ४0 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनदरबारी पाठविला आहे, असे अव्वलवार यांनी सांगितले. या पत्रपरिषदेला उपस्थित असलेल्या आमदार पिंपळे यांनी महान धरणातून थेट मूर्तिजापूरला येणार्या पाइपलाइनचे काम ९0 टक्के पूर्ण झाले असून, येत्या सहा महिन्यात शहराची पाणी समस्या कायमस्वरूपी निकाली निघणार असल्याचे सांगितले. पिण्याच्या पाण्यासाठी १३ व्या वित्त आयोगा तील संपूर्ण रकमेचा भरणा केल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे, निजाम इंजिनियर, इब्राहिम घाणीवाला, उपाध्यक्ष लखन अरोरा, नगरसेवक विनायक गुल्हाने आदी उपस्थित होते.