पाणी पुरवठा दूषित नाही; प्रयोगशाळेचा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 02:51 PM2019-04-03T14:51:25+5:302019-04-03T14:51:27+5:30

अकोला: अकोलेकरांना होणारा पिवळ्या रंगाचा पाणी पुरवठा दूषित नसल्याचा अहवाल जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडून प्राप्त झाला आहे.

 Water supply is not contaminated; Laboratory Report | पाणी पुरवठा दूषित नाही; प्रयोगशाळेचा अहवाल

पाणी पुरवठा दूषित नाही; प्रयोगशाळेचा अहवाल

Next

अकोला: अकोलेकरांना होणारा पिवळ्या रंगाचा पाणी पुरवठा दूषित नसल्याचा अहवाल जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडून प्राप्त झाला आहे. मंगळवारी शहराच्या विविध भागात पाणी पुरवठा झाला असता, तो पिवळ्या रंगाचा नसल्याची माहिती आहे. पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी जलप्रदाय विभागातील हालचाली वाढल्या आहेत.
मागील काही दिवसांपासून शहरवासीयांना पिवळ्या रंगाचा गढूळ पाणी पुरवठा होत असल्याचे चित्र होते. पाण्याचा गढूळपणा लक्षात घेता सदर पाण्याच्या बाबतीत अकोलेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. धरणात मुबलक जलसाठा असूनही नागरिकांना गढूळ पाणी पुरवठा होत असल्याने ऐन उन्हाळ्यात शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने वारंवार प्रकाशित केले. याप्रकरणी जलप्रदाय विभागाची भूमिका लक्षात घेता शिवसेना आ. गोपीकिशन बाजोरिया, गटनेता राजेश मिश्रा यांच्यासह नगरसेवकांनी सोमवारी मनपात धाव घेऊन यासंदर्भात आयुक्त संजय कापडणीस यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. याप्रकरणाची गंभीरपणे दखल घेत आयुक्तांनी स्वत: महान येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी करून तांत्रिक अडचणी दूर करण्याचे निर्देश दिले होते. पाण्याचे नमुने पुढील तपासणीसाठी जिल्हा प्रयोगशाळेत सादर केले होते. मुख्य अणुजीव शास्त्रज्ञांनी सदर पाणी पिण्यायोग्य असल्याचा अहवाल दिल्याचा दावा जलप्रदाय विभागाने केला आहे. यादरम्यान, मंगळवारी शहराच्या विविध भागात पाणी पुरवठा झाला असता, तो पिवळसर नसल्याचे समोर आले.

 

Web Title:  Water supply is not contaminated; Laboratory Report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.