तेल्हारा शहरातील पाणीपुरवठा चार दिवस राहणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:18 AM2021-05-16T04:18:22+5:302021-05-16T04:18:22+5:30
तेल्हारा : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला हिवरखेडनजीक गळती लागली आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने शहराचा पाणीपुरवठा १७ ...
तेल्हारा : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला हिवरखेडनजीक गळती लागली आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने शहराचा पाणीपुरवठा १७ ते २० मे असा एकूण चार दिवस बंद राहणार आहे. ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत चार दिवस पुरेल एवढा जलसाठा कसा करून ठेवावा, अशी चिंता शहरवासीयांना पडली आहे.
तालुक्यातील वारी हनुमान येथील वान धरणातून ८४ खेड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी असलेली मुख्य जलवाहिनी हिवरखेडनजीक लिकेज झाली आहे. यामधून हजारो लीटर पाण्याचा अपव्यय होत आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम १७ मेपासून सुरू होणार आहे. याच जलवाहिनीद्वारे तेल्हारा शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू होत असल्याने शहराचा पाणीपुरवठासुद्धा १७ ते २० मे असा चार दिवस बंद राहणार आहे. ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत शहवासीयांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. चार दिवस पाणी पुरेल एवढा साठा ठेवावा लागत असल्याने शहवासीयांची चिंता वाढली आहे.