अकोला जिल्ह्यातील २० गावांत टँकरद्वारे पाणी पुरवठा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:45 PM2019-05-27T12:45:57+5:302019-05-27T12:47:03+5:30
अकोला : जिल्ह्यातील २० गावांमध्ये १८ टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्यात येत असून, पाणीटंचाईच्या परिस्थितीत टँकरच्या पाण्यावर ग्रामस्थांना तहान भागवावी लागत आहे.
अकोला : जिल्ह्यातील २० गावांमध्ये १८ टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्यात येत असून, पाणीटंचाईच्या परिस्थितीत टँकरच्या पाण्यावर ग्रामस्थांना तहान भागवावी लागत आहे.
तापत्या उन्हासोबतच जिल्ह्यातील विविध भागांत पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, टंचाईग्रस्त गावांना प्रशासनामार्फत टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील २० गावांना १८ टँकरद्वारे पाणी पुरवठा येत आहे. गावांत टँकर पोहोचल्यानंतर पाण्यासाठी ग्रामस्थांची झुंबड होत आहे. भीषण पाणीटंचाईच्या परिस्थितीत टँकरच्या पाण्यावर ग्रामस्थांना तहान भागवावी लागत आहे.
टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असलेली अशी आहेत गावे!
जिल्ह्यात २० गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यामध्ये अकोला तालुक्यातील दापुरा, गोणापूर, कौलखेड जहागीर. बार्शीटाकळी तालुक्यात पुनोती बु., देवदरी वरखेड, जामवसू, धाबा, मांगुळ मिर्झापूर. अकोट तालुक्यात अमोना, शिवपूर, बोर्डी. बाळापूर तालुक्यात मोरगाव सादीजन, उमरा. पातूर तालुक्यात सुकळी, पिंपळखुटा, तुलंगा खुर्द, शिरपूर, माळराजुरा आणि मूर्तिजापूर तालुक्यात सोनोरी इत्यादी गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.