अकोला जिल्ह्यातील २८ गावांत टँकरद्वारे पाणी पुरवठा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 12:56 PM2019-05-31T12:56:52+5:302019-05-31T12:57:04+5:30
अकोला : जिल्ह्यातील सहा तालुक्यांत पाणीटंचाईग्रस्त २८ गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असून, संबंधित गावांतील ग्रामस्थांची तहान टँकरच्या पाण्यावर भागविली जात आहे.
अकोला : जिल्ह्यातील सहा तालुक्यांत पाणीटंचाईग्रस्त २८ गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असून, संबंधित गावांतील ग्रामस्थांची तहान टँकरच्या पाण्यावर भागविली जात आहे.
तापत्या उन्हासोबतच जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होत असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, अकोट, बाळापूर, पातूर व मूर्तिजापूर इत्यादी सहा तालुक्यांतील पाणीटंचाईग्रस्त २८ गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. चार शासकीय व २४ खासगी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असून, संबंधित २८ गावांतील ६७ हजार ३९० ग्रामस्थांची तहान टँकरच्या पाण्यावर भागविली जात आहे. गावांत टँकर पोहोचल्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची टँकरवर गर्दी होत आहे.
टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असलेली अशी आहेत गावे!
तालुका गावे
अकोला ६
बार्शीटाकळी ५
अकोट ३
बाळापूर ५
पातूर ८
मूर्तिजापूर १
.................................
एकूण २८