शहरात आठव्या दिवशी होणार पाणीपुरवठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 02:26 AM2017-08-12T02:26:10+5:302017-08-12T02:26:10+5:30

अकोला : पावसाने दडी मारल्यामुळे शहरावर जलसंकटाचे ढग गडद  होण्याची चिन्हं आहेत. पावसाचा अंदाज आणि महान धरणातील उ पलब्ध जलसाठा लक्षात घेता अकोलेकरांना दर आठव्या दिवशी  पाणीपुरवठा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय  यांनी दिले आहेत. २१ ऑगस्टपासून अकोलेकरांना दर आठव्या  दिवशी पाणीपुरवठा करण्याचा निर्णय मनपाच्या जलप्रदाय विभागाने  घेतला आहे. 

Water supply will be done on the eighth day in the city! | शहरात आठव्या दिवशी होणार पाणीपुरवठा!

शहरात आठव्या दिवशी होणार पाणीपुरवठा!

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकार्‍यांचे महापालिकेला निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पावसाने दडी मारल्यामुळे शहरावर जलसंकटाचे ढग गडद  होण्याची चिन्हं आहेत. पावसाचा अंदाज आणि महान धरणातील उ पलब्ध जलसाठा लक्षात घेता अकोलेकरांना दर आठव्या दिवशी  पाणीपुरवठा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय  यांनी दिले आहेत. २१ ऑगस्टपासून अकोलेकरांना दर आठव्या  दिवशी पाणीपुरवठा करण्याचा निर्णय मनपाच्या जलप्रदाय विभागाने  घेतला आहे. 
पावसाचे अडीच महिने उलटून गेले असले, तरी अद्यापही विदर्भात  समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे धरणांमधील जलसाठय़ात  किंचितही वाढ झाली नसल्याचे चित्र आहे. आगामी दिवसांत पाऊस  आल्यास धरणांमधील जलसाठय़ात कि ती वाढ होईल, याबाबत  साशंकता आहे. अकोलेकरांना महान (काटेपूर्णा प्रकल्प) धरणातून  पाणीपुरवठा केला जातो. आजरोजी धरणात १८.२0 टक्के जलसाठा  शिल्लक आहे. धरणातील उपलब्ध जलसाठा पाहता आगामी दिवसांत  शहरावर जलसंकटाचे ढग गडद होण्याची दाट चिन्हं आहेत. त्या  पृष्ठभूमिवर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी ८ ऑगस्ट  रोजी महापालिकेच्या जलप्रदाय विभागाकडून कामकाजाचा आढावा  घेतला. धरणातील जलसाठा व पावसाचा अंदाज पाहता आता पासूनच शहराच्या पाणीपुरवठय़ात कपात करण्याची सूचना  जिल्हाधिकार्‍यांनी मनपाला केली. नागरिकांना दर आठव्या दिवशी  पाणीपुरवठा करण्याचे निर्देश जलप्रदाय विभागाला देण्यात आले  आहेत. त्यानुसार २१ ऑगस्टपासून पाणीपुरवठय़ाच्या वेळापत्रकात  बदल करून, दर आठव्या दिवशी पाणीपुरवठा करण्याचा निर्णय  जलप्रदाय विभागाने घेतला आहे. 

पाण्याच्या नासाडीला लगाम!
शहरातील काही ठरावीक भागात थेट मुख्य जलवाहिनीला अवैधरी त्या ‘टॅपिंग’ करून पाण्याची चोरी केली जात होती. मनपा आयुक्त  अजय लहाने यांनी असे ‘टॅपिंग’काढून घेत पर्यायी जलवाहिन्यांचे  जाळे टाकले. पाणीपुरवठय़ाच्या वेळापत्रकात बदल केला. यामुळे  पाण्याच्या नासाडीला लगाम बसला आहे. 

Web Title: Water supply will be done on the eighth day in the city!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.