टरबूज शेतातच खराब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:18 AM2021-05-24T04:18:07+5:302021-05-24T04:18:07+5:30
अकोला : जिल्ह्यात फळ व भाजीपाला विक्रीसाठी सकाळी ११ पर्यंतच वेळ असल्याने व्यापारी टरबूज खरेदी करण्यास तयार नाही. त्यामुळे ...
अकोला : जिल्ह्यात फळ व भाजीपाला विक्रीसाठी सकाळी ११ पर्यंतच वेळ असल्याने व्यापारी टरबूज खरेदी करण्यास तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल शेतात पडून आहे. बहुतांश माल तेथेच खराब होत आहे.
ढगाळ वातावरणामुळे आरोग्यावर परिणाम
अकोला : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे लहान मुलांमध्ये ताप, खोकल्याच्या समस्या वाढल्या आहे. कोरोनाच्या काळात रोगराईमुळे भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.
माठ व्यावसायिकांना फटका
अकोला : मागील वर्षी प्रमाणे यंदाही ऐन उन्हाळ्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याने माठ व्यावसायिकांना आर्थिक फटका बसला आहे. कडक निर्बंधांमुळे व्यवसाय ठप्प आहे. घरखर्च कसा भागवावा, असा प्रश्न त्यांच्या समोर आहे.
बियाण्यांच्या काळाबाजाराची शक्यता
अकोला : खरीप हंगाम जवळ आला आहे. त्यामुळे बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. या दरम्यान बियाण्यांचा काळाबाजार होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.