वान धरणाच्या पाण्यासाठी तेल्हारा तालुक्यातील शेतकर्‍यांचा जलसमाधीचा इशारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 07:29 PM2017-12-05T19:29:22+5:302017-12-05T19:50:25+5:30

वान धरणाचे पाणी रब्बी पिकांना ७ डिसेंबर पर्यंत न सोडल्यास वान धरणावर जलसमाधी घेऊ असा इशारा  वाडी अदमपूर परिसरातील शेतकर्‍यांनी तेल्हारा तहसिलदारांकडे ५ डिसेंबरला निवेदनाद्वारे दिला आहे.

Watershed water for farmers of Wan dam! | वान धरणाच्या पाण्यासाठी तेल्हारा तालुक्यातील शेतकर्‍यांचा जलसमाधीचा इशारा!

वान धरणाच्या पाण्यासाठी तेल्हारा तालुक्यातील शेतकर्‍यांचा जलसमाधीचा इशारा!

Next
ठळक मुद्देरब्बी हरभरा पेरुन एक महिन्याचा कालावधी उलटला७ डिसेंबरपर्यंत धरणाच्या कालव्यात पाणी सोडा - शेतकर्‍यांची मागणीतेल्हारा तहसिलदारांना निवेदनाद्वारे दिला जलसमाधीचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
वाडी अदमपूर (अकोला): वान धरणाचे पाणी रब्बी पिकांना ७ डिसेंबर पर्यंत न सोडल्यास वान धरणावर जलसमाधी घेऊ असा इशारा  वाडी अदमपूर परिसरातील शेतकर्‍यांनी तेल्हारा तहसिलदारांकडे ५ डिसेंबरला निवेदनाद्वारे दिला आहे. 
वाडी अदमपूर येथील शेतकर्‍यांनी आपल्या शेतात रब्बी पिक हरभरा पेरुन एक महिन्याचा कालावधी होवून गेला. परंतु पाणी सोडण्याचे आश्‍वासन देऊन अद्यापपर्यंत वान धरणाच्या कालव्याला पाणी सोडण्यात न आल्याने रब्बी पिक हरभरा धोक्यात आले आहे. हरभरा पिक फुलोरावर आल्याने पाण्याची आवश्यकता आहे. वान धरणाच्या कालव्याला ७ तारखेपर्यंत पाणी न आल्यास वान धरणावर जलसमाधी घेऊ असा इशारा निवेदनाद्वारे वाडी अदमपूर येथील शेतकरी शरद वाघ, विष्णु वाघ, गोविंद अवचार, अनंत तळोकार, योगेश तिव्हाणे, विठ्ठल तिव्हाणे, सिद्धेश्‍वर तिव्हाणे, विष्णु शेळके, रविंद्र घोराळ, प्रविण शर्मा, दिलीप तिव्हाणे, सुरेंद्र भोंगळ, संजय राठी, सचिन धोटे, अनील खारोडे, गोपाल भाकरे, विनोद भोंगळ, संजय तिव्हाणे, गजानन निर्मल आदी शेतकर्‍यांनी लेखी निवेदनाद्वारे तेल्हारा तहसिलदारांकडे मागणी केली आहे.

Web Title: Watershed water for farmers of Wan dam!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.