ग्रामस्थांच्या माथी तेलकट पाणी!

By admin | Published: May 23, 2016 01:51 AM2016-05-23T01:51:23+5:302016-05-23T01:51:23+5:30

पाणीपुरवठय़ासाठी तेल वाहतूक करणारे टँकर, ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात.

Watery olive oil from the villagers! | ग्रामस्थांच्या माथी तेलकट पाणी!

ग्रामस्थांच्या माथी तेलकट पाणी!

Next

संतोष येलकर /अकोला
खारपाणपट्टय़ातील अकोला तालुक्यात खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ५५ पैकी ३५ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे; मात्र पाणीपुरवठा करणारे काही टँकर तेल वाहतूक करणारे असल्यामुळे तहानलेल्या ग्रामस्थांना तेलकट पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
अकोला शहरासह खारपाणपट्टय़ातील अकोला तालुक्यातील ६४ गावांना खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत काटेपूर्णा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो; परंतु गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने, यावर्षी काटेपूर्णा धरणातील जलसाठा केवळ अकोला शहरासाठी आरक्षित करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून गत नोव्हेंबरपासून सुकळी येथील तलावातून ६४ गावांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला; मात्र सुकळीचा तलाव आटल्याने या तलावातून ६४ गावांना होणारा पाणीपुरवठा १३ मे पासून बंद झाला आहे. त्यामुळे खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ५५ गावांना २६ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले आहेत. मात्र, सोयाबीन व सरकीचे तेल वाहून नेणार्‍या टँकरद्वारे हा पाणीपुरवठा होत असल्याचे आढळून आले आहे. पाण्यावर तेलाचे तवंग आणि दुर्गंधी येत असल्याने, काही गावांमध्ये टँकरच्या पाण्याचा उपयोग पिण्याऐवजी वापरासाठी करण्यात येत आहे; मात्र पिण्यायोग्य पाणी स्रोत उपलब्ध नसलेल्या बहुतांश गावांमधील ग्रामस्थांना टँकरद्वारे मिळणार्‍या तेल तवंगाच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.

Web Title: Watery olive oil from the villagers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.