‘एमआयडीसी’तील उद्योग पाण्याअभावी बंद पडण्याच्या मार्गावर

By admin | Published: May 5, 2016 02:37 AM2016-05-05T02:37:49+5:302016-05-05T03:07:51+5:30

कुंभारी तलाव आटला; पाणी पुरवठय़ासाठी विहिरी केल्या अधिग्रहित.

On the way of MIDC's closure of the industry due to lack of water | ‘एमआयडीसी’तील उद्योग पाण्याअभावी बंद पडण्याच्या मार्गावर

‘एमआयडीसी’तील उद्योग पाण्याअभावी बंद पडण्याच्या मार्गावर

Next

राम देशपांडे / अकोला
औद्योगिक परिसराला खांबोरा प्रकल्पातून होणारा पाणीपुरवठा नोव्हेंबर २0१४ मध्ये बंद झाल्यानंतर, औद्योगिक विकास महामंडळाने कुंभारी तलावातून पाणीपुरवठा सुरू केला; मात्र वाढत्या तापमानामुळे कुंभारी तलाव आटत चालला असून, निम्म्यापेक्षाही कमी म्हणजे 0.९ दश्लक्ष घनमीटरपर्यंत हा पाणीपुरवठा येऊन ठेपला आहे. पाण्याचे वाढते दुर्भिक्ष लक्षात घेऊन, औद्योगिक विकास महामंडळाने परिसरातील विहिरी अधिग्रहित केल्या. तथापि, पाच विहिरींपैकी केवळ एकच विहीर पाणीपुरवठा करण्यास सक्षम असल्याचे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे औद्योगिक परिसरातील जेमतेम तग धरून असलेले उद्योग पाण्याअभावी बंद पडतात की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
चार फेजमध्ये विभागलेल्या औद्योगिक परिसरातील एकूण १ हजार १९२ उद्योजकांनी पाणीवापराबाबत औद्योगिक विकास महामंडळाकडे नोंदणी केली आहे; मात्र त्यापैकी ५९२ उद्योग पाणीपुरवठय़ाअभावी पूर्णत: बंद पडले असून, उर्वरित ६00 उद्योग पाटबंधारे विभागाच्या कुंभारी प्रकल्पातील पाणीपुरवठय़ावर तग धरून आहेत. औद्योगिक परिसरातील उद्योगांना ११ नोव्हेंबर २0१४ पूर्वी खांबोरा प्रकल्पातून प्रतिदिन २0 लाख लिटर (२ एमएलडी) पाणीपुरवठा व्हायचा; मात्र पाण्याचे वाढते दुर्भिक्ष लक्षात घेऊन, तो बंद करण्यात आला. त्यानंतर २0 नोव्हेंबर २0१४ पासून कुंभारी प्रकल्पातून प्रतिदिन १0 लाख २0 हजार लिटर (१.२ एमएलडी) एवढा पाणीपुरवठा करण्यात आला; मात्र गेल्या तीन महिन्यांपासून प्रतिदिन ९0 हजार लिटर (0.९ एमएलडी) एवढय़ावर येऊन ठेपलेल्या या पाणीपुरवठय़ात आणखी कपात करण्यात आली असून, २८ एप्रिलपासून तो प्रतिदिन ७ लाख ५0 हजार लिटर (0.७५ एमएलडी) एवढय़ावर येऊन ठेपला आहे. एकीकडे झपाट्याने होत असलेले बाष्पीभवन, तर दुसरीकडे याच प्रकल्पातून मलकापूर ग्रामपंचायतीला सुरू असलेला पाणीपुरवठा या दोन प्रमुख बाबींमुळे कुंभारी तलाव आटत चालला आहे.

Web Title: On the way of MIDC's closure of the industry due to lack of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.