पेरण्या आटोपण्याच्या मार्गावर; पीक कर्ज वाटप २१ टक्क्यावरच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 02:35 PM2018-07-06T14:35:42+5:302018-07-06T14:38:36+5:30
अकोला: खरीप पेरण्या आटोपण्याच्या मार्गावर असताना, जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ४ जुलैपर्यंत पीक कर्जाचे वाटप २१.१४ टक्क्यावरच आहे. केवळ ३० हजार २६३ शेतकºयांना २६८ कोटी ८२ लाख रुपये पीक कर्जाचे वाटप करण्यात आल्याने, यावर्षीच्या खरीप हंगामात पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अकोला: खरीप पेरण्या आटोपण्याच्या मार्गावर असताना, जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ४ जुलैपर्यंत पीक कर्जाचे वाटप २१.१४ टक्क्यावरच आहे. केवळ ३० हजार २६३ शेतकऱ्यांना २६८ कोटी ८२ लाख रुपये पीक कर्जाचे वाटप करण्यात आल्याने, यावर्षीच्या खरीप हंगामात पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
खरीप पेरणीसाठी बियाणे, खते व जमीन मशागतीचा खर्च भागविण्यासाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाची गरज असते. त्यानुषंगाने यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १ हजार ३३४ कोटी ५९ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत ठरविण्यात आले आहे. गत १ एप्रिलपासून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत पीक कर्जाचे वाटप सुरू करण्यात आले; परंतु जिल्ह्यात ६५ टक्क्यापेक्षा अधिक खरीप पेरण्या आटोपल्या असल्या तरी, ४ जुलैपर्यंत जिल्ह्यात केवळ ३० हजार २६३ शेतकऱ्यांना २६८ कोटी ८२ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. पीक कर्ज वाटपाचे प्रमाण अद्याप २१.१४ टक्क्यावरच असल्याच्या स्थितीत यावर्षीच्या खरीप हंगामात पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
खरीप हंगामासाठी जिल्ह्यात शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप करण्यात येत आहे. ४ जुलैपर्यंत ३० हजार २६३ शेतकºयांना २६८ कोटी ८२ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया बँकांमार्फत सुरू आहे.
- गोपाळ मावळे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)