आम्ही प्लाझ्मा दिला; तुम्ही पण द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 04:54 PM2020-07-22T16:54:57+5:302020-07-22T16:55:10+5:30

पाच रुग्णांनी पुढाकार घेत शासकीय रक्तपेढीमध्ये प्लाझ्मासाठी रक्तदान केले.

We gave plasma; You give too! | आम्ही प्लाझ्मा दिला; तुम्ही पण द्या!

आम्ही प्लाझ्मा दिला; तुम्ही पण द्या!

googlenewsNext

अकोला : प्लाझ्मा थेरेपीच्या किचकट प्रक्रियेमुळे कोरोनातून बरे झालेले बहुतांश रुग्ण प्लाझ्मा देण्यास नकार देत आहेत; परंतु मंगळवारी अशाच पाच रुग्णांनी पुढाकार घेत शासकीय रक्तपेढीमध्ये प्लाझ्मासाठी रक्तदान केले. शिवाय, आम्ही प्लाझ्मा दिला, तुम्हीदेखील द्या, असे आवाहनदेखील या माध्यमातून त्यांनी इतर कोरोनाबाधित रुग्णांना केले.
अकोल्यात प्लाझ्मा थेरेपी सुरू झाल्यापासून कोरोनातून बरे झालेल्या बहुतांश रुग्णांनी प्लाझ्मा देण्यास नकार दिला. त्यासाठी कोरोनाविषयीची भीतीदेखील कारणीभूत आहे; परंतु कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी कुणीतरी पुढाकार घेणे गरजेचे होते, अशातच सोमवारी पाच रक्तदात्यांनी जे कोरोनातून पूर्णत: बरे झाल्यावर प्लाझ्मासाठी रक्तदान केले. यामध्ये अत्तर खान ऊर्फ बंटीभाई, मसुद खान, शाकीर अली हाहुणअली, मोहम्मद साजिद गवळी आणि सुमित भांबेरे या पाच जणांनी प्लाझ्मासाठी रक्तदान केले. यासाठी सामाजिक कार्यकर्ता पराग गवई यांनी पुढाकार घेतला.

होय, मी कोरोनाविरुद्ध लढलो आणि जिंकलो. आता इतरांनीही कोरोनाला हरविण्यासाठी लढायला हवे. त्यासाठी मी पुढाकार घेऊन प्लाझ्मासाठी रक्तदान केले. आता इतर कोरोनाबाधित रुग्णांनीही बरे झाल्यानंतर कोरोनाला हरविण्यासाठी प्लाझ्मा दान करा.
- मसुद खान, रक्तदाता, अकोला

कोरोनाला हरविण्यासाठी जाती-धर्माचा भेदभाव न करता प्रत्येकाने सामूहिक कोरोनाविरुद्ध लढा पुकारण्याची गरज आहे. त्याची सुरुवात आम्ही स्वत:पासून केली. अकोलेकरांनो, आता तुमच्या साथीची गरज आहे. तुम्ही कोरोनाबाधित असाल किंवा कोरोनातून बरे झाले असला, तर नक्कीच प्लाझ्मा दान करा. प्रत्येकाची साथ मिळाल्यास लवकरच अकोला कोरोनामुक्त होईल.
- अत्तर खान ऊर्फ बंटीभाई, रक्तदाता, अकोला

कोण करू शकतो प्लाझ्मा दान?
ज्या व्यक्तीला कोरोनाची लक्षणे होती
हिमोग्लोबिन १२.५ असणे आवश्यक
वजन ५० किलोपेक्षा जास्त असणे आवश्यक
१८ ते ६० वर्ष वयोगटातील रुग्ण

कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी प्रत्येकाने असाच पुढाकार घेण्याची गरज आहे. कोरोनाला हरवायचे असेल, तर कोरोनातून बरे झालेल्या प्रत्येक रुग्णांची साथ आवश्यक आहे.
- डॉ. श्रीराम चोपडे, विभाग प्रमुख, शासकीय ब्लड बँक, जीएमसी, अकोला

 

Web Title: We gave plasma; You give too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.