आम्ही अकोलेकर सुधारणार नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:51 AM2021-02-20T04:51:00+5:302021-02-20T04:51:00+5:30

काय आहे ‘जीएमसी’तील वास्तव? बाह्यरुग्ण विभागात चिठ्ठी फाडण्यासाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची होणारी गर्दी. रांगेत कुठलेही सोशल डिस्टन्सिंगचे पालन ...

We will not improve Akolekar! | आम्ही अकोलेकर सुधारणार नाही !

आम्ही अकोलेकर सुधारणार नाही !

Next

काय आहे ‘जीएमसी’तील वास्तव?

बाह्यरुग्ण विभागात चिठ्ठी फाडण्यासाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची होणारी गर्दी.

रांगेत कुठलेही सोशल डिस्टन्सिंगचे पालन नाही.

अनेकांच्या नाका तोंडाला मास्क नाही.

काहींचे मास्क हनुवटीवर लागलेले.

रुग्णांसोबतच काही कर्मचारीही फिरताहेत विनामास्क.

मेडिकलचालकही मास्कविनाच.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालय परिसराची पाहणी करताना परिसरातील जीवनधारा मेडिकलमधील तिन्ही कर्मचारी मास्कविनाच बसलेले आढळून आले. रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक मेडिकलवर औषध खरेदीस येतात, तेव्हादेखील मेडिकलचालक त्यांच्यासोबत विनामास्कच संवाद साधताना दिसून येतात.

कॅन्टिनमध्येही फिजिकल डिस्टन्सिंग नाहीच.

रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांसाठी सर्वोपचार रुग्णालय परिसरात कॅन्टिन असून, या ठिकाणीही कॅन्टिनचालक व कर्मचाऱ्यांकडून मास्कचा वापर होताना दिसत नाही. या ठिकाणी ग्राहकांसाठी सॅनिटायझर किंवा हात धुण्याची व्यवस्थादेखील नसल्याचे चित्र दिसून आले. यापेक्षा गंभीर परिस्थिती रुग्णालयाबाहेरील कॅन्टिनवर दिसून येत आहे.

पोलीसदादाही बेफिकीर

बहुतांश नागरिक पोलिसांच्या धाकानेच मास्क अन् कोरोना विषयीच्या नियमांचे पालन करतात, मात्र इतरांप्रमाणे पोलीसदादाही बेफिकीर असल्याचे गुरुवारी ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकच्या माध्यमातून निदर्शनास आले.

असा पसरतोय शहरात कोरोना

नमस्कार नाही, आता थेट हस्तांदोलनास झाली सुरुवात.

कापड बाजारासह इतर बाजारपेठेत अनेक जण कारण नसतानाही गर्दी करीत आहेत.

रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे होणारी गर्दी आणि त्यातून येणारा संपर्क कोरोनाच्या फैलावास कारणीभूत ठरत आहे.

अनेकजण चालत्या वाहनातूनच रस्त्यावर थुंकतात.

सराफाबाजार, मोबाइल शॉपी, बँका, शासकीय कार्यालयांमध्येही होत नाही कोविड नियमांचे पालन.

Web Title: We will not improve Akolekar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.