चौकशीत दोषी आढळल्यास कारवाई करू; बीडीओंचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:18 AM2021-05-10T04:18:10+5:302021-05-10T04:18:10+5:30

विजयकुमार ताले हे १० मे रोजी पातूर पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात आत्मदहन करण्यावर ठाम आहेत. सावरगाव ग्रामपंचायतीचे तत्कालीन सचिव ...

We will take action if found guilty in the investigation; Assurance of BDs | चौकशीत दोषी आढळल्यास कारवाई करू; बीडीओंचे आश्वासन

चौकशीत दोषी आढळल्यास कारवाई करू; बीडीओंचे आश्वासन

Next

विजयकुमार ताले हे १० मे रोजी पातूर पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात आत्मदहन करण्यावर ठाम आहेत. सावरगाव ग्रामपंचायतीचे तत्कालीन सचिव पी. पी. चव्हाण यांनी गेल्या सात वर्षांपासून ग्रामपंचायतीचा प्रभार दिला नाही. ते झरंडी ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असून, ग्रामपंचायतीला पाणी फाऊंडेशनच्या मिळालेल्या १८ लाखांच्या पारितोषिकातून कामे न करता या रकमेचा अपहार केल्याचा आरोप निवेदनातून ताले यांनी केला होता; परंतु संबंधितांकडून अद्यापही दखल किंवा चौकशी केली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे १५ दिवसांच्या आत चौकशी करून तत्कालीन सचिव पी. पी. चव्हाण यांच्यावर कारवाई करा, अन्यथा गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयाच्या आवारात आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.

जिल्हा परिषद पथकाद्वारे यापूर्वीच चौकशी झाली आहे. चौकशी अहवालानुसार पुढील कार्यवाही सुरू आहे. चौकशीमध्ये दोषी असणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

-अनंता लव्हाळे, गटविकास अधिकारी पंचायत समिती, पातूर,

Web Title: We will take action if found guilty in the investigation; Assurance of BDs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.