आठवडी बाजारांना बंदी; पण गावागावात बाजार सुसाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:14 AM2021-06-18T04:14:01+5:302021-06-18T04:14:01+5:30
मास्क हनुवटीवर बाजारात खरेदीसाठी जाणारे ग्राहक व विक्रेत्यांचा मास्कही हनुवटीवर असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येते. अकाेला शहरात तर ...
मास्क हनुवटीवर
बाजारात खरेदीसाठी जाणारे ग्राहक व विक्रेत्यांचा मास्कही हनुवटीवर असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येते. अकाेला शहरात तर अनेक चाैकांमध्ये भाजीची दुकाने रस्त्यावर लागतात तेथेही मास्कचा वापर कमी असल्याचे दिसून येते.
फिजिकल डिस्टन्सिंग नाहीच
बाजारात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन हाेणे शक्यच नाही. भाजी किंवा इतर साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी हाेतच असते. त्यामुळे काेराेना प्रतिबंधक नियमांचे पालन हाेताना दिसत नाही.
कारवाईचे फक्त निर्देश!
आठवडी बाजारावर बंदी असली तरी गावागावातील बाजार भरलेले दिसतानाही संबंधित अधिकारी कारवाई करताना दिसत नाहीत. जिल्हाभरात अशा बाजारातील एका दुकानदारावर प्रशासनाने कारवाई केलेली नाही. त्यामुळे बंदीचे आदेश केवळ कागदाेपत्रीच आहेत.
शासनाने घालून दिलेल्या निर्देशानुसार आपला जिल्हा तिसऱ्या टप्प्यात असून बाजारावर बंदी आहे. जेथे बाजार थाटला जात असेल तेथील संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईबाबत सूचना दिल्या आहेत. त्याचे किती पालन झाले, याचा आढावा घेतला जाईल.
-संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी, अकाेला