तीव्र कुपोषित बालकांचे वजन औषधाने वाढवणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 12:18 PM2019-02-13T12:18:38+5:302019-02-13T12:18:45+5:30

अकोला : गृहभेटीतून ग्रामीण भागातील अति तीव्र कुपोषित बालकांच्या आरोग्यात सुधारणेसाठी जिल्ह्यात ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यात आले. त्या केंद्रातील १०२ बालकांच्या वजनात वाढ करण्यासाठी पूरक पोषण आहार दिला जात आहे.

The weight of highly malnourished children will increase by medicine! | तीव्र कुपोषित बालकांचे वजन औषधाने वाढवणार!

तीव्र कुपोषित बालकांचे वजन औषधाने वाढवणार!

Next

अकोला : गृहभेटीतून ग्रामीण भागातील अति तीव्र कुपोषित बालकांच्या आरोग्यात सुधारणेसाठी जिल्ह्यात ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यात आले. त्या केंद्रातील १०२ बालकांच्या वजनात वाढ करण्यासाठी पूरक पोषण आहार दिला जात आहे. ‘एनर्जी डेन्स न्युट्रीशियस फूड’ या नावाने दिल्या जाणारे औषध पावडर १२ आठवडे दिली जाणार आहे. त्याचा परिणाम पाहून त्याबाबतचा निर्णय शासन घेणार आहे.
पावसाळ््यात बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण वाढते. काही प्रमाणात बालमृत्यूही वाढतात. ही बाब आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभागासाठी आव्हानात्मक ठरते. त्यातच जिल्ह्यात कुपोषित बालकांचे प्रमाण अधिक असल्याची चर्चा दरम्यानच्या काळात झाली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य आणि महिला व बालकल्याण विभागाने ही बाब गांभीर्याने घेत उपाययोजनांची सुरुवात केली. जिल्ह्यात कुपोषित बालकांचा नव्याने शोध घेण्यात आला. गृहभेटीतून प्रत्येक बालकाचे वजन, उंची, दंडघेर, आरोग्यविषयक तक्रारींची माहिती घेण्यात आली. त्यामध्ये डिसेंबर २०१८ अखेर जिल्ह्यातील आठही प्रकल्पांत १०२ बालके अति तीव्र कुपोषित असल्याचे पुढे आले. त्यापैकी तीव्र आणि मध्यम कुपोषित बालकांवर उपचार करण्याची सोय ग्राम बालविकास केंद्रात करण्यात आली. या केंद्रातील सकस आहार व औषधाचा खर्च भागवण्यासाठी अंगणवाडी स्तरावरच व्हीसीडीसीचा निधी देण्यात आला. तीव्र आणि मध्यम कुपोषित बालकांच्या संख्येनुसार जिल्ह्यात ग्राम बालविकास केंद्रांची संख्या निश्चित झाली. बालकांवर केंद्रात उपचार सुरू आहेत. दरम्यान, शासनाने बालकांचे वजन वाढवण्यासाठी औषध पावडरचा पुरवठा सुरू केला. प्रत्येक बालकाला दररोज एक पाकीट याप्रमाणे जिल्ह्यात दररोज ११५ पाकिटे वाटप केली जात आहेत. डिसेंबरपासून १२ आठवड्यांसाठी ९६६० पाकिटांचा पुरवठा जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडे झाला आहे. त्याचे वाटप दैनंदिन होत आहे. १२ आठवड्यांनंतर बालकांच्या वजनात किती फरक पडतो, त्यावरून पुढील पुरवठा निश्चित होणार आहे.
 

- प्रकल्पनिहाय ग्राम बालविकास केंद्र
प्रकल्प                  बालक संख्या
अकोला-                १ ११
अकोला-२                ०७
बार्शीटाकळी             ००
अकोट                      ०५
तेल्हारा                    ०६
बाळापूर                   ६५
मूर्तिजापूर               ००
पातूर                        ०८

 

Web Title: The weight of highly malnourished children will increase by medicine!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.