सद्भावना पदयात्रेचे जैन समाजाकडून स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 01:44 AM2017-09-27T01:44:37+5:302017-09-27T01:44:52+5:30

अकोला : अहिंसा, शाकाहार, व्यसनमुक्ती, पर्यावरण संतुलन प्रचारार्थ मुनी श्री १0८ विद्यासागरजी महाराज यांच्या पावन आशीर्वादाने अतिशय क्षेत्र कुंथलगिरी ते सिद्धक्षेत्र रामटेक या मार्गाने पदयात्रा जात आहे. या पदयात्रेचे वितोडा येथे अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्था अकोला जिल्हा व सकल जैन समाजाकडून स्वागत करण्यात आले.

Welcoming the Sadbhavana Yatra to the Jain Community | सद्भावना पदयात्रेचे जैन समाजाकडून स्वागत

सद्भावना पदयात्रेचे जैन समाजाकडून स्वागत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अहिंसा, शाकाहार, व्यसनमुक्ती, पर्यावरण संतुलन प्रचारार्थ मुनी श्री १0८ विद्यासागरजी महाराज यांच्या पावन आशीर्वादाने अतिशय क्षेत्र कुंथलगिरी ते सिद्धक्षेत्र रामटेक या मार्गाने पदयात्रा जात आहे. या पदयात्रेचे वितोडा येथे अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्था अकोला जिल्हा व सकल जैन समाजाकडून स्वागत करण्यात आले.
स्वर्ण संयम सद्भावना पदयात्रेस १३ सप्टेंबर रोजी कुंथलगिरी येथे मुनी श्री १0८ नेमीसागर महाराज यांच्या पदस्पर्शाने प्रारंभ झाला असून, ५ ऑक्टोबर रोजी पदयात्रा सिद्धक्षेत्र रामटेक येथे मुनी श्री १0८ विद्यासागरजी महाराज यांच्या चरणी आशीर्वाद प्राप्तीकरिता पोहोचणार आहे. ही पदयात्रा बाल ब्रह्मचारी तात्याभैया यांच्या मार्गदर्शनात मार्गक्रमण करीत असून, काल वितोडा या गावी अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्था अकोला जिल्हा व सकल जैन समाजाकडून स्वागत करण्यात आले. यावेळी पदयात्रेतील सहभागींचा सत्कार करून फळ वाटप करण्यात आले. या पदयात्रेचे प्रणेते दिलीप घेवारे असून, यामध्ये पवन अंबुरे परभणी, संतोष पांगळ मुरुड, अनिल जैन अंबाजोगाई, उदय लेंगडे पुणे, महावीर जैन धर्मापूर, राजकुमार चौगुले पुणे, डॉ. सुरेश गोसावी औरंगाबाद, नितीन शहा बारामती, मुकुंद वालचाळे आदी मान्यवरांच्या सहभागात ही पदयात्रा मार्गक्रमण करीत आहे. मार्गक्रमणादरम्यान या पदयात्रेमधे युवक, ज्येष्ठ श्रावक, श्राविका सहभागी होत आहेत.
या पदयात्रींच्या स्वागतासाठी प्रा. अनंत आगरकर, विनोद उकळकर, प्रा. डॉ. प्रकाश कहाते, किरण टोपरे, प्रदीप फुरसुले, फुलचंद बुरसे, गजानन काळे, संजय गडेकर, धनंजय संघई, विनोद अवथनकर, अरविंद काळे, विलास इंदाने, महावीर खंडारे, सतीश बुरसे, दीपक कस्तुरे, महावीर गवारे, देवीदास बेलोकार इत्यादींचे सहकार्य लाभले, असे अकोला जिल्हाध्यक्ष प्रा. अनंत आगरकर यांनी कळविले आहे.

Web Title: Welcoming the Sadbhavana Yatra to the Jain Community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.