पश्चिम व-हाडात अस्थमा बळावतोय
By admin | Published: June 24, 2015 01:30 AM2015-06-24T01:30:12+5:302015-06-24T01:30:12+5:30
ढगाळ वातावरणाचा परिणाम ; २५ टक्के अस्थमा रुग्णांना धोका.
ब्रम्हानंद जाधव/मेहकर (बुलडाणा) : पश्चिम वर्हाडात गत एक आठवड्यापासून ढगाळ वातावरण असल्याने, याचा अस्थमा रुग्णांना त्रास होत आहे. ढगाळ वातावरणामुळे सुमारे २५ टक्के अस्थमा रुग्णांना धोका निर्माण झाला असून, पश्चिम वर्हाडात दिवसेंदिवस अस्थमा बळावत असल्याचे दिसून येत आहे. पश्चिम वर्हाडातील बुलडाणा, अकोला व वाशिम जिल्ह्यात आठवडाभरापासून ढगाळ वातावरण असल्याने अस्थमा अर्थात दमा झपाट्याने वाढत आहे. प्रदूषण, धुम्रपानामुळे शहरांमध्ये फुफ्फुसांचा आजार पाय पसरवत आहे. त्यामध्ये अस्थमा रुग्णांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. अस्थमा रुग्णांना इन्हेलेशन थेरेपीचे महत्व पटावे यासाठी ह्यब्रिथ फ्री क्लिनिक ऑन व्हीलह्ण या अभियानाच्या माध्यमातून २0१४ मध्ये पश्चिम वर्हाडातील तालुका व ग्रामीण स्तरावर रुग्णांसाठी फिरते जागृती आणि तपासणी पथक राबविण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात अकोला व बुलडाणा जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये तपासणी केली असता मोठय़ा प्रमाणावर अस्थमाचे रुग्ण आढळून आले. तसेच बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे २७0 जणांचे स्क्रिनिंग करण्यात आले होते; त्यात ८0 जणांना अस्थमाची प्राथमिक लक्षणे आढळली होती. तर नांदुरा येथे १६0 पैकी ४५ जण अस्थमाच्या चाचणित संशयित आढळले होते. त्यानंतर अकोला जिल्ह्यातील एकट्या बाळापुरात ३७0 जणांची प्राथमिक तपासणी केली असता, ११२ जणांना अस्थमाची लक्षणे आढळली होती. अकोला शहरात १९0 पैकी ६५ जण अस्थमाच्या चाचणीत संशयित आढळले. देशात २0 व्यक्तींमध्ये एकाला व दर १0 मुलांमध्ये एकाला अस्थमा हा आजार बळावत असून, यात शालेय मुलांचे प्रमाणही वाढत आहेत. आठवडाभरापासून असलेल्या ढगाळ वातावरणाचा परिणाम सुमारे २५ टक्के रुग्णांवर झाला आहे. पश्चिम वर्हाडातील अस्थमा रुग्णांना वातावरणातील बदलाचा धोका निर्माण झाला आहे.
*१0 रुग्णांमध्ये दोन अस्थमा रुग्ण
ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात अस्थमा अर्थात दमा रुग्णांची संख्या मोठी आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जिल्ह्याच्या ठिकाणी दिवसाकाठी १00 हून अधिक नव्या अस्थमाच्या रुग्णांची भर पडत आहे. तर पश्चिम विदर्भातील शहराच्या ठिकाणी येणार्या ह्रदयरोग तज्ञांच्या हॉस्पीटलमध्ये १0 रुग्णांमध्ये दोन जणांना अस्थमाचे लक्षण आढळून येत आहेत.