पश्चिम विदर्भात सहाव्या दिवशी पावसाची उघडीप !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:22 AM2021-08-23T04:22:02+5:302021-08-23T04:22:02+5:30
मध्यंतरी जवळपास २० दिवस पावसाने दडी मारल्याने पिके कोमेजली होती. कपाशी, सोयाबीन व इतर पिकांवर किडींनी हल्ला चढविला होता. ...
मध्यंतरी जवळपास २० दिवस पावसाने दडी मारल्याने पिके कोमेजली होती. कपाशी, सोयाबीन व इतर पिकांवर किडींनी हल्ला चढविला होता. पश्चिम विदर्भात मंगळवारपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली. गत पाच दिवस सलग पाऊस सुरू होता. या पावसामुळे नदी, नाले वाहू निघाले. दिवसभर झळीचे वातावरण राहत होते; परंतु पाच दिवसानंतर रविवारी सूर्याचे दर्शन झाले व पावसाची रिपरिप थांबली. बुलडाणा, वाशीम व अकोला जिल्ह्यांतही पाऊस झाला नाही. या रिपरिपमुळे पिकांवर रोगराई वाढण्याची भीती होती. पावसाने उघाड दिल्याने ही भीती काही प्रमाणात कमी झाली आहे.
मोठ्या प्रकल्पांत ६९.२७ टक्के साठा
पाच दिवस झालेल्या पावसामुळे प्रकल्पांच्या जलसाठ्यात वाढ झाली. यामध्ये पश्चिम विदर्भातील मोठ्या नऊ प्रकल्पांमध्ये ६९.२७ टक्के साठा निर्माण झाला, तर चार प्रकल्पांची दारे उघडण्यात आली. यामधून पाण्याचा विसर्ग सुरू होता.