पश्चिम विभागीय खो-खो स्पर्धा: मुंबई विद्यापीठ संघ अजिंक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 07:57 PM2019-11-23T19:57:49+5:302019-11-23T20:00:40+5:30
पश्चिम विभागीय खो-खो स्पर्धा: मुंबई विद्यापीठ संघ अजिंक्य
- नीलिमा शिंगणे-जगड
अकोला: डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ क्रीडांगण येथे पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ महिला खो-खो स्पर्धेचा समारोप शनिवारी झाला. स्पर्धेतील अंतिम सामना मुंबई विद्यापीठ संघ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघात झाला. अतितटीच्या या सामन्यात मुंबई संघाने ७-४ अशा गुणांनी वर्चस्व निर्माण करू न स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. पुणे विद्यापीठाने या संपूर्ण स्पर्धेत सुंदर खेळप्रदर्शन केले. मात्र, उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तृतीय स्थान शिवाजी विद्यापीठ कोल्हापुर संघाने मिळविले. तर चतुर्थस्थानी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संघ राहिला.तत्पूर्वी,तृतीय स्थानासाठी झालेल्या सामन्यात कोल्हापुर संघाने पहिल्या डावात १५-५ अशी आघाडी घेवून अमरावतीवर दबाव निर्माण केला. दुसºया डावात ६-४ असे गुण मिळविले. अखेर हा सामना कोल्हापुरने १ डाव ६ गुणांनी जिंकून स्पर्धेत तिसºया स्थानी राहिला. बक्षीस वितरण अंतिम सामना समाप्तीनंतर लगेच बक्षीस वितरण व स्पर्धा समारोप कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी शिक्षण तथा संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे होते. प्रमुख अतिथी म्हणून कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.श्यामसुंदर माने होते. विशेष अतिथी म्हणून डॉ. विनीत हिंगणकर उपस्थित होते. व्यासपीठावर विदर्भ खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर निंबाळकर, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विभागप्रमुख डॉ. सुधीर वडतकर, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख विराजमान होते.यावेळी मान्यवरांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. स्पर्धेत प्रथम चार स्थान प्राप्त करणाºया संघांना चषक व स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले. खेळाडू, संघ व्यवस्थापक आणि प्रशिक्षकांनी देखील मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन डॉ. मित्तल सुपे यांनी केले. आभार डॉ. मोहन तोटावार यांनी मानले.
गोरखपुरला आंतरविभागीय स्पर्धा डीडीयु गोरखपुर विद्यापीठ(उत्तरप्रदेश)येथे आंतरविभागीय खो-खो (महिला)स्पर्धा २०१९-२० चे आयोजन केले आहे. फेब्रुवारीच्या दुसºया आठवडयामध्ये या स्पर्धा होणार आहे. या मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापुर आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ पश्चिम विभागाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. असा आहे विजेता संघ विजेता मुंबई संघामध्ये संजना कुडाव, रू पाली बडे, प्रणाली मगर, कविता घाणेकर, नम्रता यादव, गौरी पवार, आरती कदम, श्रध्दा लाड, गुलाब म्हसकर, ऋतिका सोनवणे, शितल भोर, रेश्मा राठोड, प्रशिक्षक पुनम मुजावर यांचा समावेश होता