७ हजार मोलकरणींच्या रोजीरोटीची सोय, १९ हजार जणींचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:17 AM2021-04-17T04:17:40+5:302021-04-17T04:17:40+5:30
जिल्ह्यातील मोलकरणींची संख्या २६ हजार नोंदणीकृत मोलकरणी ७ हजार मोलकरणींच्या नोंदणीचा घोळ जिल्ह्यात २०११ मध्ये घरेलू कामगार मंडळांतर्गत सुरुवातीला ...
जिल्ह्यातील मोलकरणींची संख्या
२६ हजार
नोंदणीकृत मोलकरणी
७ हजार
मोलकरणींच्या नोंदणीचा घोळ
जिल्ह्यात २०११ मध्ये घरेलू कामगार मंडळांतर्गत सुरुवातीला मोलकरीण कामगार म्हणून १ लाखांवर महिलांनी नोंदणी केली. दरवर्षी पुनर्नोंदणी करावी लागते; परंतु घरेलू कामगारांच्या बाबतीत शासनाच्या योजनाच नसल्यामुळे शेकडो मोलकरणींनी नोंदणी केली नाही. ज्यांना कधीतरी योजना सुरू होईल, अशी आशा होती. त्यांनी मात्र, दरवर्षी नोंदणी केली. कामगार कल्याण आयुक्त कार्यालयाच्या माहितीनुसार सद्य:स्थितीत ७ हजार मोलकरणींची नोंद आहे.
अकोला जिल्ह्यात ४० हजारांच्या जवळपास मोलकरणींची संख्या आहे. शासनाने मदत देऊ केली आहे; परंतु प्रत्यक्षात फार कमी मोलकरणींना शासनाची मदत मिळेल. सध्या घरांमधील कामे बंद असल्याने, मोलकरणींच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. शासनाने मोलकरणींना सरसकट मदत द्यावी.
-कल्पना शैलेश सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष श्रमिक मोलकरीण संघटना
आम्ही मोलकरीण म्हणून काम करतो; परंतु आमची नोंदणी नाही. त्यामुळे शासनाची मदत आम्हाला मिळणार नाही. कोरोनामुळे अनेक घरांमधील कामे बंद झाली आहेत. आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. शासनाने नियम व अटी न लादता, मोलकरणींना सरसकट मदत द्यावी.
-सुनंदाबाई ताजने, मोठी उमरी
शासनाने मोलकरणींना मदत देण्याचा चांगला निर्णय घेतला; परंतु आमची नोंदणी नसल्यामुळे आम्हाला मदत कशी मिळणार. मोलकरणींची माहिती संकलित करून नोंदणी नसलेल्या मोलकरणींनासुद्धा आर्थिक मदत करावी. सध्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
-कल्पना मेढे, आंबेडकरनगर