अण्णाभाऊ साठे यांनी जे पाहिल तेच शब्दांमध्ये उतरवल-आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:17 AM2021-02-14T04:17:50+5:302021-02-14T04:17:50+5:30

पातूर तालुक्यातील भंडारज फाट्यावरील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे क्रांतीभूमिवरील सभागृहाचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ...

What Annabhau Sathe saw in words is Utarval-Ambedkar | अण्णाभाऊ साठे यांनी जे पाहिल तेच शब्दांमध्ये उतरवल-आंबेडकर

अण्णाभाऊ साठे यांनी जे पाहिल तेच शब्दांमध्ये उतरवल-आंबेडकर

googlenewsNext

पातूर तालुक्यातील भंडारज फाट्यावरील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे क्रांतीभूमिवरील सभागृहाचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी केले. यावेळी अण्णाभाऊ साठे क्रांतीभूमीला जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून सभापती आकाश शिरसाट यांनी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. यावेळी वंचितचे प्रदेश प्रवक्ते धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जि. प. अध्यक्षा प्रतिभा भोजने, उपाध्यक्षा सावित्री राठोड, सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी, मनिषाताई बोर्डे, ॲड. संतोष रहाटे, पुष्पा इंगळे, दिनकरराव खंडारे, दीपक गवई, शंकरराव इंगळे, गजानन गवई, सिद्धार्थ शिरसाट, सुनील फाटकर, विनोद देशमुख, सचिन शिराळे, विकास सदाशिव, निर्भय पोहरे, प्रदीप शिरसाट, शंकर इंगोले, ओम प्रकाश धर्माळ आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला पराग गवई, संतोष गवई, नितीन सपकाळ यांच्यासह जालना येथील चंद्रकांत कारके, सचिन कांबळे, गजानन दांडगे, प्रभाकर लांडगे, प्रमोद घोडे, वासुदेव डोलारे, जगदीश भोंगळ, गजानन तायडे, नारायण मानवतकर, गजानन साठे, सुनंदा चांदणे, उमाताई अंभोरे, गंगाधर सावळे, रमेश वानखडे, शेषराव वाघमारे, सुभाष इंगळे, बाबुराव चार, सुनील अवचार, मोहन तायडे, रवी खडसे, सचिन अंभोरे, प्रल्हाद वानखडे, सोनू खडसे, मधुकर वानखडे, संजय धुरंधर, काशिनाथ अंभोरे, प्रशांत दवंडे, भगवान नृपनारायण, संजय जाधव यांच्यासह जिल्ह्यातील मातंग समाज बांधव उपस्थित होते.

फोटाे:

Web Title: What Annabhau Sathe saw in words is Utarval-Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.