बारावीच्या परीक्षांवर पर्याय काय? शासन विचारात, विद्यार्थी संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:21 AM2021-05-25T04:21:15+5:302021-05-25T04:21:15+5:30

अकाेला : कोरोनाच्या पृष्ठभूमीवर राज्य शासनाने इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केली. आता बारावीच्या परीक्षेवर काथ्याकूट सुरू आहे. ...

What are the options for 12th standard exams? In government thinking, in student confusion | बारावीच्या परीक्षांवर पर्याय काय? शासन विचारात, विद्यार्थी संभ्रमात

बारावीच्या परीक्षांवर पर्याय काय? शासन विचारात, विद्यार्थी संभ्रमात

Next

अकाेला : कोरोनाच्या पृष्ठभूमीवर राज्य शासनाने इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केली. आता बारावीच्या परीक्षेवर काथ्याकूट सुरू आहे. निकाल कोणत्या पद्धतीने लागणार, विद्यार्थ्यांचे वर्षभराचे मूल्यमापन आणि शालेय पातळीवर घेतलेल्या परीक्षांच्या आधारे निकाल लागणार की असे नानाविध प्रश्न पालकांसह विद्यार्थ्यांसमोर आहेत. या परीक्षांबाबत शासन सध्यातरी विचारात असून विद्यार्थी संभ्रमात असल्याचे चित्र आहे.

बारावीची परिक्षा ही विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे

बारावीच्या परीक्षेचे मूल्यांकन महत्त्वाचे. मूल्यांकन नसेल तर अध्ययन व अध्यापनाचे गांभीर्यच राहणार नाही. विद्या विनयेन शोभते प्रमाणे आता ‘विद्या परीक्षेन शोभते’ म्हणावं लागेल.

बारावीच्या गुणांच्या आधारे वैद्यकीय व अभियांत्रिकीसह इतर विद्याशाखांना प्रवेश दिला जाताे. बारावीची परीक्षाही विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दुष्टीने सर्वात महत्वाची परीक्षा आहे त्यामुळे या परीक्षेच्या मूल्यमापनावर सध्या चर्चा सुरू आहेत. दुसुरीकडे अंतर्गत मूल्यमापन कसे होणार, कशा पद्धतीने करणार? याबाबत पालकांना चिंता वाटत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून विद्यार्थ्यांचे संरक्षण व्हावे. यासाठी राज्य शासनाने दहावीची परीक्षा रद्द केली. मात्र आता काेराेनाची लाट ओसरत आहे त्यामुळे परिक्षा घ्यावी असा एक मतप्रवाह शिक्षण तज्ज्ञांमध्ये आहे तर काहींना बहुपर्यायी प्रश्नावली असलेली ऑनलाईन परीक्षा घेण्याबाबतही विचारसमाेर येत आहे. शासनाने सध्या तरी याबाबत काहीही स्पष्ट केलेले नाही त्यामुळे बारावीच्या परीक्षांचा निर्णय सध्यातरी अधांतरी आहे.

अनेक महत्वाच्या विद्याशाखांचे बारावी हे प्रवेशद्वार आहे त्यामुळे विद्यार्थ्याचे मूल्यमापन हे परीक्षेद्वारेच हाेणे अपेक्षित आहे, काेराेनाची परिस्थिती बघून परीक्षेबाबत निर्णय व्हावा .बारावीची परीक्षा ऑनलाइन घेणे हा खरे तर याेग्य पर्यया नाही. मात्र काेराेनाची लाट ओसरत नसेल तर बहुपया प्रश्नावली स्वरूपात परीक्षा घेता येतील

- डॉ. रामेश्वर भिसे, प्राचार्य, शिवाजी महाविद्यालय

..

कोरोना परिस्थिती सुधारण्ण्याची वाटच केंद्रीय व राज्य शिक्षण मंडळ पाहत राहिले. मूल्यांकनाच्या रू पर्यायी व्यवस्थेचा विचार पण केला नाही.

आता सर्व विषयांची परीक्षा घेणे कठीण असेल तर ,ज्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश पाहिजे असेल त्यासंबंधी विषयांची कृत्रिम बुत्रि मत्तेचा (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) उपयोग करून बहुपर्यायी निवड प्रश्नांव्दारे मुल्यांकन होणे सहज शक्य आहे. ह्या सर्व परिक्षा त्या त्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश परिक्षा म्हणून असतील.

-डाॅ संजय खडक्कार,

परिक्षा व मूल्यमापन समिती सदस्य,

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.

.....................

बारावीची परीक्षा आवश्यकच आहे, गेल्या वषीर् काेराेनाकाळातच नीटची परीक्षा झाली त्यामुळे उपाययाेजना व नियमांचे पालन करून परीक्षा हाेणे हाच एक पय

आहे. बारावी नंतर इतर विद्याशाखांचे प्रवेश हाेतात त्यामुळे परिक्षा गरजेचीच आहे

प्रा. प्रकाश डवले, प्राचार्य डवले महाविद्यालय

.................

मुक्त विद्यामीठाने घेतल्या परिक्षा

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने कुलगुरू डाॅ. ई. वायुनंदन यांच्या मार्गदर्शनाखाली, डाॅ. दिनेश भोंडे, कुलसचिव यांच्या तज्ज्ञ देखरेखीखाली,

मागील वर्षी व यंदा ही त्यांच्या सर्व परीक्षा बहुपर्यायी निवड प्रश्नावली या पध्दतीने यशस्वीपणे घेतल्या. हाच पॅटर्न बारावीसाठी लावण्यात यावा असा एक मतप्रवाह आहे

......................

Web Title: What are the options for 12th standard exams? In government thinking, in student confusion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.