शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी विद्यापीठ, कृषी विभागाने काय केले?

By admin | Published: October 9, 2015 01:45 AM2015-10-09T01:45:23+5:302015-10-09T01:45:23+5:30

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना ‘दिलासा’ बैठकीत किशोर तिवारी यांचा सवाल.

What did agriculture department do to prevent farmer suicides? | शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी विद्यापीठ, कृषी विभागाने काय केले?

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी विद्यापीठ, कृषी विभागाने काय केले?

Next

अकोला : शेतकर्‍यांमधील नैरश्य कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सांगत, शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाने काय केले, असा सवाल शासनाच्या क.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी गुरुवारी येथे उपस्थित केला. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या मदतीसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकरिता जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या ह्यदिलासाह्ण कार्यक्रम अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रामुख्याने खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह, अकोला पंचायत समिती सभापती गंगू धामोळे, आरोग्य उपसंचालक लव्हाळे, महावितरणचे अधीक्षक अभियंता यशवंत कांबळे, तेल्हारा पंचायत समिती सभापती लिला गावंडे उपस्थित होत्या. शेतकरी आत्महत्या होत असताना, शेतकरी आत्महत्याग्रस्त कोणत्या कुटुंबांच्या घरी कृषी विद्यापीठांचे अधिकारी गेले, असा प्रश्न उपस्थित करित शेतकरी आत्महत्यांशी त्यांचा नसल्याचे जाणवते. शेतकर्‍यांमधील नैराश्येला अनेक कारणे असली तरी, नैराश्यग्रस्त शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत असतील तर, त्याला राज्यातील कृषी विद्यापीठे आणि कृषी विभाग जबाबदार असल्याचा इशाराही तिवारी यांनी यावेळी दिला. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सवलतीच्या दरात देण्यात येणारा धान्याचा लाभ, राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत लाभार्थ्यांंना दिला जाणारा लाभ यासंदर्भात तिवारी आढावा घेतला. जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या मदतीसाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याकरिता जिल्हा प्रशासनमार्फत राबविण्यात येत असलेल्या ह्यदिलासा ह्ण कार्यक्रमाची माहिती जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी यावेळी दिली. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांसह तालुका कृषी अधिकरी व विविध विभागाचे जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.

Web Title: What did agriculture department do to prevent farmer suicides?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.