अनाथ, निराधारांनी काय खायचे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:17 AM2021-04-06T04:17:28+5:302021-04-06T04:17:28+5:30
जिल्ह्यातील आश्रमांना हवा मदतीचा हात अकाेला- संकट कुठलेही असले तरी दातृत्वाच्या हातांनी कधीही हात आखडता घेतला नाही. मात्र, ...
जिल्ह्यातील आश्रमांना हवा मदतीचा हात
अकाेला- संकट कुठलेही असले तरी दातृत्वाच्या हातांनी कधीही हात आखडता घेतला नाही. मात्र, काेराेनाच्या संकटात सर्वच अर्थचक्र ठप्प झाल्याने दातृत्वाच्या हातांनाही मर्यादा आल्या. यामुळे अशा दात्यांच्या भरवशावर असलेल्या अनाथ, एचआयव्ही बाधित मुले, वृद्धाश्रम अशा संस्थांना माेठा फटक बसला आहे. या संस्थांना मिळणारी मदत मंदावल्यामुळे अशा अनाथ निराधारांनी खायचे तरी काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे
अकाेला शहर व जिल्हाभरात अनाथांसाठी झटणारे अनेक दाते आहेत. ते आपल्या उत्पन्नातील काही रक्कम अशा आश्रमांसाठी सढळ हाताने देत असतात, मात्र अशा अनेक दात्यांना काेराेनामुळे आर्थिक मंदीला समाेरे जावे लागल्यामुळे अशा दात्यांचे हात आखडल्या गेले आहेत. एकीकडे शासनाचे अनुदान नाही तर दुसरीकडे दातृत्वाचा झरा आटलेला अशा स्थितीत या आश्रमांमध्ये सध्या ‘दात काेरून पाेट भरण्यासारखी ’ स्थिती आहे. काही दात्यांनी केलेल्या मदतीवर गेले वर्ष निघाले. मात्र, आता पुन्हा काेराेनाचे संकट उभे ठाकल्याने असे आश्रम चालविणाऱ्यांची माेठी ससेहाेलपट हाेत आहे.
..................
एचआयव्ही बाधित मुलांची ससेहाेलपट
अकाेल्यात सूर्याेदय आश्रम आहे. यामध्ये ४२ एचआयव्ही बाधित मुलांचे संगाेपन हाेते. काेराेनामुळे आश्रमाच्या मदतीचा ओघ आटला आहे. या आश्रमाने शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठविला आहे, ताे प्रलंबितच आहे ताे मंजूर हाेणे गरजेच आहे.
........................
दहीगावच्या वृद्धाश्रमाचे अनुदान रखडले
तेल्हारा तालुक्यात दहीगाव येथे श्रीनाथ वृद्धाश्रम आहे. येथे २५ वृद्ध आहेत. काेराेनामुळे आश्रमाच्या मदतीचा हात आखडता झाल्याने या वृद्धाश्रमाची आर्थिक काेंडी झाली आहे. आश्रमाला समाजकल्याण विभागाकडून येणारे अनुदान गेल्या दाेन वर्षांपासून रखडले आहे.
.................
आनंदाश्रमातील आनंदी उपक्रम थांबले
गुडधी येथील आनंदाश्रमात १३ मुली आहेत. हा आश्रम मुलींसाठीच आहे. वाढदिवस किंवा इतर काैटुंबिक आनंदांच्या प्रसंगी आश्रमात येणाऱ्या दात्यांचा ओघ मंदावला आहे. काेराेनामुळे असे आनंदी उपक्रमच थांबले आहेत. त्यामुळे साहिजकच आश्रमाचे आर्थिक नियेाजन काेलमडले आहे.
.....................
काेट
काेराेनामुळे अनेक कार्यक्रमांवर बंधने आली आहेत. त्यामुळे साहजिक अनाथ आश्रमांमध्ये आनंद वाटणाऱ्या दात्यांनी हात आखडता घेतला आहे. त्याचा फटका सर्वच सामाजिक उपक्रमांसह आश्रमांनाही बसला आहे. याबाबत शासनाने दखल घेऊन काेराेनाकाळात काही प्रमाणात मदतीचा हात देण्याची गरज आहे.
निरज आवंडेकर सेवाकर्मी आनंदाश्रम गुडधी
काेट
काेरानाच्या वर्षभरात सूर्याेदय आश्रमात येणाऱ्या दात्यांची संख्या घटली आहे. काही दात्यांच्या मदतीने सध्या मुलांचे संगाेपन सुरू आहे. त्यामध्ये कुठेही तडजाेड केलेली नाही, मात्र शासनाने अशा विशेष मुलांच्या आश्रमांसाठी निधी मंजुरीची प्रक्रिया तातडीने राबविण्याची गरज आहे.
शिवराज पाटील प्रकल्प समन्वयक सूर्याेदय आश्रम