उत्पन्न वाढीसाठी अकोला महापालिकेने काय केले?
By admin | Published: June 4, 2016 02:24 AM2016-06-04T02:24:47+5:302016-06-04T02:24:47+5:30
नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांनी उपटले मनपाचे कान.
आशिष गावंडे /अकोला
कर्मचार्यांचे थकीत वेतन अदा करण्यासाठी महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी मनपाकडे जमा असलेल्या 'एस्क्रो' खात्यातील ५ कोटी ७0 लक्षच्या मंजुरीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला. यासंदर्भात शुक्रवारी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी आजपर्यंत पालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी काय केले ते आधी सांगा, अशी विचारणा करीत प्रशासनाचे कान उपटल्यामुळे ह्यएस्क्रोह्णच्या निधीला घरघर लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मनपाच्या उत्पन्नवाढीसाठी कोणतेही प्रयत्न होत नसल्यामुळे कर्मचार्यांच्या थकीत वेतनाची समस्या पाचवीला पुजली आहे. १९९८ पासून अकोलेकरांच्या मालमत्ता करात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. तसेच मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन न केल्यामुळे शहरात एकूण मालमत्ता किती, याचा थांगपत्ता नाही. २0११ मध्ये सहा महिन्यांच्या थकीत वेतनासाठी कर्मचार्यांनी बेमुदत संप पुकारला होता. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १६ कोटी रुपये कर्ज स्वरूपात मनपाला दिले होते. त्याबदल्यात मनपाने उत्पन्नात वाढ करून प्रत्येक महिन्याला दहा लक्ष रुपये ह्यएस्क्रोह्ण खात्यात जमा केल्यानंतर संपूर्ण रक्कम शासनाकडे सुपूर्द करण्याची अट होती. मागील पाच वर्षांमध्ये ह्यएस्क्रोह्ण खात्यात व्याजापोटी ५ कोटी ७0 लक्ष जमा झाले. कर्मचार्यांनी संप पुकारल्यामुळे ही रक्कम वेतनासाठी मिळावी या उद्देशातून मनपा आयुक्त अजय लहाने यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केला. नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी निधी घेण्यापूर्वी मागील पाच वर्षांत उत्पन्नवाढीसाठी काय निर्णय घेतले ते आधी सांगा,अशी स्पष्ट विचारणा प्रशासनाला केली. सद्यस्थितीत कर्मचार्यांची संख्या, मनपाचे एकूण उत्पन्न किती व मालमत्ता करात वाढ न करणे तसेच पुनर्मूल्यांकन न करण्याची कारणे सादर करण्याचा आदेश दिला आहे.