मोबाईल बिघडला तर काय झाले, आरोग्य बिघडायला नको!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:14 AM2021-06-05T04:14:30+5:302021-06-05T04:14:30+5:30

ही आहेत कारणे... चार्जिंग पॉईंट बिघडला. मोबाईल स्क्रिनची समस्या. मोबाईल हँग होण्याचे प्रमाण वाढले. बॅटरीची समस्या. नेटवर्क समस्या. की ...

What if the mobile goes bad, don't let the health go bad! | मोबाईल बिघडला तर काय झाले, आरोग्य बिघडायला नको!

मोबाईल बिघडला तर काय झाले, आरोग्य बिघडायला नको!

Next

ही आहेत कारणे...

चार्जिंग पॉईंट बिघडला.

मोबाईल स्क्रिनची समस्या.

मोबाईल हँग होण्याचे प्रमाण वाढले.

बॅटरीची समस्या.

नेटवर्क समस्या.

की पॅडची समस्या.

मोबाईल चार्जरमध्ये बिघाड.

दोन महिन्यांपासून बाजारपेठ बंद

कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले होते. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता उर्वरित संपूर्ण बाजारपेठ सुमारे दोन महिन्यांपासून बंद ठेवण्यात आली होती. त्याचा फटका व्यावसायिकांना बसला. त्यामुळे व्यावसायिकही आर्थिक अडचणीत सापडले आहेत. जून महिन्याच्या पहिल्या तारखेपासून काही प्रमाणात नियम शिथिल करण्यात आल्याने बाजारपेठ पुन्हा सुरू झाल्याने व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.

नागरिकांची बेफिकिरी मात्र कायम

कोविडच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्याने बाजारपेठ पुन्हा सुरू झाली, मात्र नागरिक पुन्हा बेफिकिरीने वावरताना दिसून येत आहेत. हा प्रकार नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक तर आहेच, मात्र त्यामुळे पुन्हा कडक निर्बंध लागू शकतात. त्याचा परिणाम व्यावसायिकांवर होणार आहे. त्यामुळे दुकानांमध्ये येणाऱ्या ग्राहकांना नियमांचे पालन बंधनकारक करणे, ही व्यावसायिकांची मोठी जबाबदारी आहे.

दीड महिन्यानंतर शटर उघडले

दुकानात येणाऱ्या ग्राहकांना विनामास्क प्रवेश दिला जात नाही. अनेक ग्राहक दुकानात प्रवेश केल्यानंतर मास्क काढतात. नागरिकांनी कोविड नियमांचे पालन केल्यास त्यांच्या आरोग्यासोबतच व्यावसायिकांचे आर्थिक आरोग्यही चांगले राहील. नागरिकांनी बाजारपेठेत जाताना नियमांचे पालन करावे.

- वैभव शेषराव काळे, दुकानदार

आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. त्यात महागाई देखील वाढली आहे. दुकानाचे भाडे देणे आहे. अशा परिस्थितीत बाजारपेठ पुन्हा सुरू झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. नागरिकांनी मात्र आता नियमांचे पालन करावे. दुकानात विनामास्क प्रवेश दिला जात नाही.

- रोहित ब्रजलाणी गगलाणी, दुकानदार

मोबाईलसोबतच आरोग्यही महत्त्वाचेच

लॉकडाऊन काळात सर्वच कामे मोबाईलच्या माध्यमातून झाली. आताही मोबाईलवरच कामे सुरू आहेत. मात्र महिनाभरापासून मोबाईल बंद पडला. त्यात महत्त्वाचा डाटा असल्याने काम करताना मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे दुकान सुरू होताच मोबाईल दुरुस्तीसाठी आलो. मोबाईलसोबत आरोग्यही महत्त्वाचे आहे.

- सुनील दुबे, ग्राहक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन वर्ग सुरू आहेत, मात्र मोबाईल बंद पडल्याने मोठी अडचण झाली. दुकान सुरू झाल्याने मोबाईल दुरुस्तीसाठी आलो आहे. आरोग्य महत्त्वाचे आहेच, पण मोबाईलशिवाय कामे होणे शक्य नाहीत.

- राज अवचार, ग्राहक

Web Title: What if the mobile goes bad, don't let the health go bad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.