दहावीच्या दाखल्यांवर शेरा काय असणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:17 AM2021-07-25T04:17:34+5:302021-07-25T04:17:34+5:30
जिल्ह्यातील माध्यमिक शाळा- ५३४ दहावीतील विद्यार्थी- २५,६३३ पास विद्यार्थी- २५,६३१ मुख्याध्यापक म्हणतात... ...
जिल्ह्यातील माध्यमिक शाळा- ५३४
दहावीतील विद्यार्थी- २५,६३३
पास विद्यार्थी- २५,६३१
मुख्याध्यापक म्हणतात...
दरवर्षी गुणपत्रिकेसोबतच शाळा सोडल्याचा दाखला देतो. परंतु अद्यापही गुणपत्रिकाच बोर्डाकडून आल्या नाहीत. दाखल्यावर शेरा लिहिताना, विद्यार्थ्यांची टक्केवारी, कोणत्या श्रेणीत उत्तीर्ण झाला. हे लिहावे लागणार आहे. परंतु तारीख कोणती टाकायची. याबाबत संभ्रम आहे. बोर्डाने गुणपत्रिका पाठविल्यानंतर सूचनाही येतील.
-मनीषा अभ्यंकर, मुख्याध्यापिका भारत विद्यालय
दहावीचा निकाल ऑनलाइन लागला. परंतु अद्याप गुणपत्रिका वितरणाची तारीख आली नाही. शाळेचा दाखला देताना, गुणपत्रिकेवरील तारीख आणि शेऱ्यामध्ये उत्तीर्ण असे लिहावे लागणार आहे. परंतु याबाबत बोर्डाकडून अशा कोणत्याही सूचना आल्या नाहीत. काही सूचना आल्यास, त्यानुसार शाळेचे दाखले देऊ.
-माधव मुन्शी, मुख्याध्यापक, न्यू इंग्लिश हायस्कूल
पालक म्हणतात...
दहावीचा निकाल लागला. आता गुणपत्रिकेची प्रतीक्षा आहे. शाळेच्या दाखल्यावर आता शेरा लिहितात, याची कल्पना नाही. परंतु गुणवंत विद्यार्थ्यांच्या दाखल्यावर चांगला शेरा असावा. सीईटी परीक्षा ऐच्छिक आहे. त्यामुळे संभ्रम आहे. गुणपत्रिका व दाखले लवकर द्यावेत.
-ज्ञानेश्वर खोबरखेड, पालक
निकाल लागल्यावर शाळेच्या दाखल्यावर ग्रेड देतात की श्रेणी देतात, याची माहिती नाही. परंतु अकरावी प्रवेशास पात्र असा शेरा न लिहिता, विद्यार्थ्यांना ग्रेड द्यावे. यात गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. यंदा सर्वच विद्यार्थी एकाच रांगेत आणून ठेवले. त्यामुळे गुणवंतांचे नुकसान होऊ नये.
-नारायण पवार, पालक