आचारसंहिता भंग करणा-यांच्या तक्रारीसाठी व्हॉट्स अँप क्रमांक

By admin | Published: February 16, 2017 10:23 PM2017-02-16T22:23:37+5:302017-02-16T22:23:37+5:30

तक्रारकर्त्यांचे नाव ठेवणार गोपनीय, अकोला पोलिसांचा उपक्रम.

What's an ammunition for complaints of violators of Code of Conduct | आचारसंहिता भंग करणा-यांच्या तक्रारीसाठी व्हॉट्स अँप क्रमांक

आचारसंहिता भंग करणा-यांच्या तक्रारीसाठी व्हॉट्स अँप क्रमांक

Next

अकोला, दि. १५- महापालिका निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचा भंग केल्यास त्याची तक्रार तत्काळ करण्यासाठी अकोला जिल्हा पोलीस प्रशासनाद्वारे व्हॉट्सअँप क्रमांक देण्यात आला आहे. कुठेही आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास या क्रमांकावर तक्रार केल्यानंतर तत्काळ कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी दिली आहे. ८८0५४६११00 हा व्हॉट्सअँप क्रमांक पोलिसांनी दिला असून, शहरात कु ठेही आचारसंहितेचा भंग झाल्यास यावर तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अकोला पोलीस प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून आदर्श आचारसंहितेचा भंग करणार्‍यांची तत्काळ तक्रार व्हावी आणि तत्काळ कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी पोलीस दलाचा व्हॉट्सअँप क्रमांक या तक्रारीसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. या व्हॉट्सअँप क्रमांकावर केवळ निवडणुकीतील आदर्श आचारसंहितेच्या भंग करणार्‍यांचीच तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. व्हॉट्सअँप क्रमांकावर तक्रार केल्यास तक्रारकर्त्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आचारसंहितेचा भंग करणार्‍यांची पुराव्यासह तक्रार सदर व्हॉट्सअँप क्रमांकावर करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी केले आहे.
 

Web Title: What's an ammunition for complaints of violators of Code of Conduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.