गव्हाला सरासरी १७२५ दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:17 AM2021-04-19T04:17:13+5:302021-04-19T04:17:13+5:30
अकोला : बाजार समितीत गव्हाची आवक सुरू आहे. शनिवारी गव्हाला सरासरी १ हजार ७२५ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तर, ...
अकोला : बाजार समितीत गव्हाची आवक सुरू आहे. शनिवारी गव्हाला सरासरी १ हजार ७२५ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तर, ४८९ क्विंटल आवक झाली होती. गव्हाला कमीतकमी १,६००, जास्तीतजास्त १,८५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. जिल्ह्यात गहू पिकाची लागवड कमी असल्याने आवक वाढण्याची शक्यता कमीच आहे.-------------------------------------------------
जिल्ह्याचे तापमान ४२.२ अंश सेल्सिअस
अकोला : काही दिवस ढगाळ वातावरणानंतर जिल्ह्याच्या तापमानात पुन्हा वाढ होत आहे. रविवारी जिल्ह्याचे तापमान ४२.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. वातावरणातील बदल पाहता पारा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शहरात कडक निर्बंध असल्याने रस्त्यांवर गर्दीही कमी झाली आहे.
-----------------------------------------------------
उड्डाणपूल अर्धवट स्थितीत
अकोला : डाबकी रोड, रेल्वेगेटवरील उड्डाणपुलाचे काम सुरू आहे; मात्र हे काम अद्यापही अर्धवट स्थितीत असून पूर्णत्वास न गेल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाचे काम तत्काळ पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
---------------------------------------------------------
उन्हाळी कांदा लवकर काढणीला!
अकोला : जिल्ह्यात ५९६ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी कांद्याची लागवड करण्यात आली आहे. हा कांदा लवकरच काढणीला येणार असून बाजारात दराची स्थिती पाहून शेतकरी विक्रीसाठी आणणार आहेत. या कांदा पिकाला काही प्रमाणात अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.