गव्हाला सरासरी १७०० रुपये दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:18 AM2021-03-18T04:18:28+5:302021-03-18T04:18:28+5:30
अकोला : गहू काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. सिंचनासाठी पाणी उपलब्ध असल्याने पीक चांगले झाले. शेतकरी मशीनच्या साहाय्याने गहू ...
अकोला : गहू काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. सिंचनासाठी पाणी उपलब्ध असल्याने पीक चांगले झाले. शेतकरी मशीनच्या साहाय्याने गहू काढणी करत आहे. बाजार समितीत गव्हाची आवक सुरू झाली आहे. गव्हाला कमीत कमी १५५० व जास्तीत जास्त १८५० रुपये तसेच सरासरी १७०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे.
---------------------------------------------------
अकोल्याचा पारा चाळिशी पार
अकोला : ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्याचा पारा घसरला होता. ३९ वरून तापमान ३६ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. हवामान विभागाने वादळी पावसासह गारपिटीचा इशाराही दिला आहे. बुधवारी पुन्हा पारा वाढला असून जिल्ह्याचे तापमान ४०.३ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. उन्हाच्या चटक्यांनी मार्च महिन्यात अकोलेकरांना हैराण केले आहे. दिवसभर अंगाची लाहीलाही करणारे ऊन होते. नागरिकांना तीव्र झळा जाणवत होत्या.
---------------------------------------------------------
फळांची आवक वाढली
अकोला : उन्हाळ्याला सुरुवात झाल्याने बाजारात फळांची आवक सुरू झाली आहे. टरबूज, खरबूज, द्राक्ष या फळांची मागणी वाढली आहे; मात्र बाजार समिती बंद असल्याने या फळांना योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी दराने माल विकावा लागत आहे. पुढील काही दिवसांत आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे.
--------------------------------------------------------------