गहू उत्पादक शेतकरी संकटात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:34 AM2021-03-13T04:34:57+5:302021-03-13T04:34:57+5:30
----------------------------------------- कार्यालयाची तोडफोड; गुन्हा दाखल उरळ : निमकर्दा येथील गो. अहेड इन्फ्रा प्रा.लि. कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून उरळ ...
-----------------------------------------
कार्यालयाची तोडफोड; गुन्हा दाखल
उरळ : निमकर्दा येथील गो. अहेड इन्फ्रा प्रा.लि. कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून उरळ पोलिसांनी ए.जी. चोपडे, गोपाळ शेजवळे, संतोष पळसकर, अतुलसिंह राजपूत, विजय हिरळकर या पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास उरळ पोलीस करीत आहेत.
------------------------------------------
कवठा येथे सांडपाणी रस्त्यावर; आरोग्य धोक्यात!
कवठा : गावात नाल्यांची साफसफाई न केल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. याबाबत तक्रार करूनही ग्रामपंचायत प्रशासाने दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. गावात घाण पाणी रस्त्यावर वाहत असल्याने गावात दुर्गंधी पसरली आहे.
------------------------------------------------------------------
आगर परिसरात पुन्हा पेटू लागल्या चुली
आगर : स्वयंपाकाचा गॅस मोठ्या प्रमाणात महागल्यामुळे सर्वसामान्य मजुरांच्या घरात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतून मिळालेले सिलिंडर व शेगडी घरात शोभेची वस्तू बनल्या आहेत. आगरसह ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी जळतन जाळून चुली पेटविल्या जात असल्याचे चित्र आहे.
------------------------------------------------------
कोरोनामुळे व्यापाऱ्यांना पुन्हा फटका!
अकोट : गेल्या काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे प्रशासनाने अनेक निर्बंध लावले आहेत. त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसत आहे.
--------------------------------------
इंधन दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका
तेल्हारा : देशात पेट्रोल आणि डिझेलमधील दरवाढीपाठोपाठ आता घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीमध्येही ४० रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या तब्बल ८८५ रुपये ग्राहकांकडून वसूल करण्यात आले. यामुळे सर्वसामान्यांना फटका बसतो.
--------------------------------------
बंदी असतानाही गुटख्याची विक्री
बार्शीटाकळी : गुटख्याच्या विक्रीला बंदी असतानाही तालुक्यात अनेक भागात गुटख्याची सर्रास विक्री होत आहे. पोलीस विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे बहुतांश नागरिक गुटख्याचे सेवन करत आहेत. विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
------------------------------------------------
रस्त्याचे काम संथ गतीने; वाहचालक त्रस्त
वाडेगाव : वाडेगाव-माझोड रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. सध्या या रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे. यामुळे किरकोळ अपघात घडत आहेत. या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी आहे.
-----------------------------------
पाणंंद रस्त्यांची दुर्दशा; शेतकरी चिंतित
बाळापूर : तालुक्यातील पाणंद रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. अनेक वर्षांपासून शेताकडे जाणारे पाणंद रस्ते दुरुस्त न केल्याने शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद रस्ता योजना राबविण्यात आली; मात्र बाळापूर तालुक्यातील अनेक शेती शिवार जोडणारे पाणंद रस्ते दुर्लक्षित आहेत.
--------------------------------
रस्ता दुरुस्ती थातूरमातूर; चौकशीची मागणी
बाळापूर : तालुक्यातील टाकळी ते खिरपुरी बु. रस्त्याची गेल्या काही महिन्यांपासून दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची दुरुस्ती थातूरमातूर सुरू असून, या रस्त्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.