गहू उत्पादक शेतकरी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:17 AM2021-03-22T04:17:42+5:302021-03-22T04:17:42+5:30
रस्त्याचे काम संथ गतीने वाडेगाव : वाडेगाव-माझोड रस्त्याचे ...
रस्त्याचे काम संथ गतीने
वाडेगाव : वाडेगाव-माझोड रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. सध्या या रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे.
कोविड लसीकरणाला वेग
बाळापूर : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ज्येष्ठ नागरिकांना कोविड लसीकरण करण्यात येत आहे. या लसीकरण मोहिमेत नोंदणी केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आठवड्यातून तीन दिवस कोविड लसीकरण करण्यात येते.
इंधन दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका
अकाेट : देशात पेट्रोल आणि डिझेलमधील दरवाढीपाठोपाठ आता घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीमध्येही ४० रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या तब्बल ८८५ रुपये ग्राहकांकडून वसूल करण्यात आले. यामुळे सर्वसामान्यांना फटका बसतो.
कोरोनामुळे व्यापाऱ्यांना पुन्हा फटका
अकोट : गेल्या काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे प्रशासनाने अनेक निर्बंध लावले आहेत. त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसत आहे.
बंदी असतानाही गुटख्याची विक्री
पिंजर : गुटख्याच्या विक्रीला बंदी असतानाही तालुक्यात अनेक भागात गुटख्याची सर्रास विक्री होत आहे. पोलिसांच्या दुर्लक्षितपणामुळे बहुतांश नागरिक गुटख्याचे सेवन करत आहेत. विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
तेल्हारा शहरात मोबाइल सेवेचा फज्जा
बाेरगाव मंजूर : बीएसएनएल तसेच इतर मोबाईल कंपन्यांच्या नेटवर्कअभावी गत अनेक महिन्यांपासून ग्राहक त्रस्त झाले आहेत. मोबाईल सेवा तासनतास खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
पक्ष्यांसाठी जलपात्र ठेवण्याचे आवाहन
अंदूरा : मार्चच्या पूर्वार्धात उन्हाची दाहकता वाढत आहे. पक्ष्यांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे पक्ष्यांसाठी घराच्या छतावर जलपात्र ठेवण्याचे आवाहन येथील पक्षिप्रेमींकडून होत आहे.
रस्ता रुंदीकरणात वृक्षांची कत्तल
दिग्रस : बाळापूर-पातूर मार्गाचे काम सुरू असून, या मार्गाच्या दोन्ही बाजूला शेकडो वर्षांपूर्वीचे मोठमोठे वृक्ष आहेत. परंतु, मार्गाच्या रुंदीकरणासाठी या डौलदार वृक्षांची कत्तल केली जात असल्याने वृक्षप्रेमींमधून नाराजी व्यक्त होत आहे.
आगर परिसरात पुन्हा पेटू लागल्या चुली
आगर : स्वयंपाकाचा गॅस महागल्यामुळे सर्वसामान्य मजुरांच्या घरात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतून मिळालेले सिलिंडर व शेगडी घरात शोभेची वस्तू बनल्या आहेत. ग्रामीण भागात जळतन जाळून चुली पेटविल्या जात असल्याचे चित्र आहे.
विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
अकाेला : कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनामार्फत त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहेत. तरीही ग्रामीण भागासह शहरात विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनातर्फे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे.
सांडपाणी रस्त्यावर; आरोग्य धोक्यात
पंचगव्हाण : गावात नाल्यांची साफसफाई न केल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. घाण पाणी रस्त्यावर वाहत असल्याने गावात दुर्गंधी पसरली आहे.
दुरुस्ती थातूरमातूर; चौकशीची मागणी
वाडेगाव : तालुक्यातील टाकळी ते खिरपुरी बु. रस्त्याची गेल्या काही महिन्यांपासून दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची दुरुस्ती थातूरमातूर सुरू असून, या रस्त्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.