धावत्या बसचे चाक निखळले !
By admin | Published: August 6, 2015 12:14 AM2015-08-06T00:14:53+5:302015-08-06T00:14:53+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील जानेफळ येथील घटना; चालकाच्या प्रसंगावधानाने टळला अपघात.
जानेफळ (जि. बुलडाणा): अमडापूरवरुन जानेफळकडे येत असलेल्या एसटी महामंडळाच्या बसचे मागील टायर निखळून पडले. ही बाब लक्षात ेयेताच शिताफीने धावती बस नियंत्रणात आणली. यामुळे मोठा अपघात टळला. ही घटना ४ ऑगस्ट रोजी पिंपरखेडजवळ सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास घडली. मेहकर आगाराची बस क्र.एम.एच.४0 ८४४५ ही बस मेहकरवरुन अमडापूरसाठी प्रवासी फेरी करीत होती. प्रवासी सोडल्यानंतर जानेफळकडे परतत असताना पिंपरखेड नजीक असलेल्या नाल्यावर अचानक बसच्या डाव्या बाजूकडील मागील चाक निखळून पडले. चालक महादेव खरात यांच्या ही बाब लगेच लक्षात आली. त्यांनी अत्यंत शिताफीने बसवर नियंत्रण मिळवून बस सुरक्षीत उभी केली. यामुळे मोठा अपघात टळला आणि सर्वच प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. बुलडाणा जिल्ह्यात अनेक बसेस भंगार झाल्या असून याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे या घटनेने अधोरेखीत केले आहे.