मनपा उपायुक्तांची नियुक्ती कधी?
By Admin | Published: December 4, 2015 03:03 AM2015-12-04T03:03:52+5:302015-12-04T03:03:52+5:30
अकोलेकरांचा सवाल; सत्ताधा-यांचे दावे ठरले फोल.
अकोला: राज्यासह महापालिकेत सत्तास्थानी असणार्या भाजप-शिवसेना यु तीला एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असला तरी अद्यापही मनपात उ पायुक्तपदी सक्षम अधिकार्यांची नियुक्ती करून घेण्यात यश आले आहे. यामुळे विकासकामांना खीळ बसण्याची चिन्हे असून, उपायुक्त दर्जाच्या अधिकार्यांची नियुक्ती कधी करणार, असा सवाल अकोलेकरांकडून उपस् िथत होत आहे. शहराचा कायापालट होईलच,असा दुर्दम्य विश्वास व्यक्त करीत भाजपने अकोलेकरांना ह्यअच्छे दिनह्णचे स्वप्न दाखवत महापालिकेची सत्ता काबीज केली. यावेळी नैसर्गिक मित्र शिवसेनेलाही सोबत घेतले. शहराचा धोरणा त्मकदृष्ट्या विकास करण्यासाठी मनपाला सक्षम अधिकार्यांची नितांत गरज आहे. तत्कालीन आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, सोमनाथ शेटे यांच्या कालावधीत शहरात विकास कामाला साधी सुरुवातदेखील झाली नाही. अ र्थातच, सत्ताधारी या नात्याने युतीच्या नगरसेवकांनी सक्षम अधिकार्यांच्या नियुक्तीसाठी पाठपुरावा करणे अपेक्षित होते. सोमनाथ शेटे यांच्या बदलीमुळे आयुक्त अजय लहाने यांच्या नियुक्तीचा अपवाद वगळता वरिष्ठ अधिकार्यांची १८ पदे रिक्त आहेत, हे येथे उल्लेखनिय. भाजप-सेना युतीच्या सत्तास्थापनेला एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असला तरी वरिष्ठ अधिकार्यांच्या नियुक्तीसाठी सत्ताधार्यांकडून ठोस प्रयत्न होत नसल्याचे चित्र आहे. मध्यंतरी आयुक्त अजय लहाने यांनी दोन उपायुक्तांची नियुक्ती करण्याची शिफारस शासनाकडे केली असली तरी अद्यापपर्यंत त्यावर निर्णय झाला नाही, हे येथे उल्लेखनीय.