‘कॉमन मॅन’ म्हणून जिल्हाधिकारी-सीईओ एसटी बसने प्रवास करतात तेव्हा..!

By Admin | Published: March 3, 2016 02:21 AM2016-03-03T02:21:13+5:302016-03-03T02:21:13+5:30

प्रवाशांसोबत साधला संवाद ; अडचणी समजून घेतल्या

When Commonwealth-CEO ST buses fly as 'Common Man' ..! | ‘कॉमन मॅन’ म्हणून जिल्हाधिकारी-सीईओ एसटी बसने प्रवास करतात तेव्हा..!

‘कॉमन मॅन’ म्हणून जिल्हाधिकारी-सीईओ एसटी बसने प्रवास करतात तेव्हा..!

googlenewsNext

संतोष येलकर / अकोला
जिल्हाधिकारी जी.श्रीकांत आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) एम.देवेंदर सिंह यांनी सर्वसाधारण नागरिक (कॉमन मॅन) म्हणून बुधवारी पातूर ते अकोला एसटी बसमधून प्रवास केला. बसमधील प्रवाशांसोबत संवाद साधून, प्रवास करताना येणार्‍या अडचणी त्यांनी समजून घेतल्या.
पातूर तालुक्यातील सुवर्णा नदीची पाहणी करण्यासाठी आणि पातूर येथे आयोजित अधिकार्‍यांच्या आढावा बैठकीसाठी बुधवारी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह गेले होते. सायंकाळी अकोल्यात परतताना जिल्हाधिकारी व ह्यसीईओंह्णनी पातूर ते अकोला थेट राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमधून प्रवास केला. रात्री ८ वाजताच्या सुमारास एसटी अकोल्यातील गीतानगर भागात जिल्हाधिकारी व सीईओ एसटी बसमधून उतरले. सर्वसामान्य नागरिक म्हणून त्यांनी एसटी बसमधून प्रवास केला. पातूर ते अकोला प्रवासादरम्यान जिल्हाधिकारी व सीईओंनी बसमधील प्रवाशांसोबत विविध मुद्यांवर चर्चा केली. तसेच बसमधून प्रवास करताना येणार्‍या अडचणी त्यांनी प्रवाशांकडून समजून घेतल्या. बसच्या चालक व वाहकांसोबतही त्यांनी चर्चा केली. जिल्ह्यातील विकासाच्या मुद्यावरही त्यांनी बसमधील प्रवाशांसोबत संवाद साधला असता, जिल्ह्यात चांगलं काम सुरू असल्याचे बसमधील प्रवाशांनी जिल्हाधिकार्‍यांना सांगितले. बसमधील साफसफाईची पाहणी केली असता, बसमध्ये स्वच्छता आढळून आली, असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

Web Title: When Commonwealth-CEO ST buses fly as 'Common Man' ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.