पाटी पेन्सिल धरणारे हात भीक मागू लागतात तेव्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:23 AM2021-09-08T04:23:58+5:302021-09-08T04:23:58+5:30
चार वर्षांपूर्वी महापालिकने भिकाऱ्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले हाेते त्यावेळी यामधील मुलांसहित वृद्धांकरिता बेघर निवाऱ्यात आश्रयाची व्यवस्था केली हाेती. ...
चार वर्षांपूर्वी महापालिकने भिकाऱ्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले हाेते त्यावेळी यामधील मुलांसहित वृद्धांकरिता बेघर निवाऱ्यात आश्रयाची व्यवस्था केली हाेती. आता पालकमंत्री बच्चू कडू यांनी भिकाऱ्यांचे सर्वेक्षण करून पुनर्वसनाची याेजनाही सुरू केली आहे, मात्र आजही भिकाऱ्यांच्या साेबत असलेली लहान मुले भीक मागताना दिसतात.
बसस्थानक
येथे भीक मागणाऱ्या एका मुलाशी बाेलण्याचा प्रयत्न केला, त्याला नाव विचारताच त्याने उत्तर देणेच टाळलं अन् धूम ठाेकली. रस्त्याच्या कडेला राहणाऱ्यांमधील एका कुटुंबातील ताे मुलगा असल्याचे समजले.
रेल्वेस्थानक
रेल्वेस्थानकाच्या पार्किंग परिसरात एक दहा ते १२ वर्षांचा मुलगा भीक मागताे, सनी असे नाव सांगताे, त्याचे कुटुंबही त्याच परिसरात राहते. दिवसभरात वीस-पंचवीस रुपये गाेळा हाेतात. घरी देताे असे म्हणाला.
भिकाऱ्यांचा प्रश्न हा केवळ भीक देऊन सुटणार नाही, त्यांच्यासाठी पुनर्वसनाची याेजना प्रभावीपणे राबविली गेली पाहिजे. काही भिकारी त्यांच्या मुलांनाही त्याच मार्गाला लावतात हे थांबणे गरजेचे आहे
पुरुषाेत्तम शिंदे, सामाजिक कार्यकर्ते