पेरणी करताना वीज अंगावर पडली; दोन शेतकरी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 05:44 PM2019-06-28T17:44:13+5:302019-06-28T17:47:09+5:30

अकोला : शेतात पेरणी करत असताना वीज अंगावर पडल्याने दोन शेतकरी ठार झाल्याची घटना बाळापूर तालुक्यातील बोराळा येथे शुक्रवार, २८ जून रोजी दुपारच्या सुमारास घडली.

 When the sowing, the lightning fell on; Two farmers killed | पेरणी करताना वीज अंगावर पडली; दोन शेतकरी ठार

पेरणी करताना वीज अंगावर पडली; दोन शेतकरी ठार

Next
ठळक मुद्देकपिल दिपक शेगोकार (१६)व बाळू नारायण उमाळे (५५)अशी या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. दोघांनाही तातडीने अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.

बाळापूर (अकोला) : शेतात पेरणी करत असताना वीज अंगावर पडल्याने दोन शेतकरी ठार झाल्याची घटना बाळापूर तालुक्यातील बोराळा येथे शुक्रवार, २८ जून रोजी दुपारच्या सुमारास घडली. कपिल दिपक शेगोकार (१६)व बाळू नारायण उमाळे (५५)अशी या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने जोर धरल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. बाळापूर तालुक्यातील बोराळा येथे शुक्रवारी एका शेतात पेरणी सुरु असताना दुपारच्या वेळी विजांच्या कडकडाटासह अचानक ढग दाटून आले. यावेळी शेतात पेरणी करीत असलेल्या कपील शेगोकार व बाळू उमाळे यांच्या अंगावर वीज पडल्याने ते दोघेही गंभीररित्या भाजल्या गेले. दोघांनाही तातडीने अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

 

Web Title:  When the sowing, the lightning fell on; Two farmers killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.