सफाई कामगारांना रजा रोखीकरणाची रक्कम कधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:17 AM2021-03-18T04:17:48+5:302021-03-18T04:17:48+5:30

बैठकीत राजू मिलांदे यांनी सांगितले की, नगर परिषद प्रशासनाचे यावर काहीच नियोजन नाही. मुख्याधिकारी नगर परिषद कोणत्याही प्रकारची माहिती ...

When will cleaners get leave cash? | सफाई कामगारांना रजा रोखीकरणाची रक्कम कधी मिळणार?

सफाई कामगारांना रजा रोखीकरणाची रक्कम कधी मिळणार?

Next

बैठकीत राजू मिलांदे यांनी सांगितले की, नगर परिषद प्रशासनाचे यावर काहीच नियोजन नाही. मुख्याधिकारी नगर परिषद कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात असमर्थ ठरत आहे. सफाई कामगारांना माहिती देण्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे. लेखापाल देखील काही बोलण्यास तयार नाही. मागील १४ ते १५ वर्षांपासून काहीच हिशोब नाही. मग सफाई कामगारांनी काय करावे ,असा प्रश्न येथे निर्माण होत आहे. शहरातील जुनी वस्ती संत मंगलदास बाबा सभागृहात दि. १५ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता महाराष्ट्र प्रदेश अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनुप खरारे यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे आयोजन करून त्यांनी सफाई कामगारांवर होत असलेल्या अन्याय अत्याचार बाबत माहिती दिली. जोपर्यंत सफाई कामगारांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, असे त्यांनी सांगितले. बैठकीला जितेंद्र गोडाले, अनिल कामवाल, प्रकाश सौदे, रमेश सौदे, जगदीश धामने, राकेश बोयत, शेख रफीक, रंजीत सौदे, विक्की बोयत, शीतल डेंडुले, सोमनाथ सौदे, धर्मेश पिवाव, लखन मिलांदे, गौरव मिलांदे, शिवा बोयत, चेतन मिलांदे, धिरज गांगडीया, गणेश पिवाल, मुकेश पिवाल, विक्की बोयत, शक्ती टांक, अविनाश टांक, दीपक टांक, श्याम कामवाल, रमेश सौदे, देवीदास डेंडुले, रवी चावरे, कैलाश सौदे, प्रवेश गोडाले, रवी सारवान आदी सफाई कामगार बैठकीला उपस्थित होते. बैठकीचे संचालन व आभार समाजाचे सरपंच राजू किसनसेठ मिलांदे यांनी केले. (फोटो)

Web Title: When will cleaners get leave cash?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.