हरभरा खरेदी केंद्र केव्हा सुरू होणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 06:04 PM2019-03-09T18:04:42+5:302019-03-09T18:04:51+5:30
अकोला : रब्बी हंगामातील हरभरा हंगाम संपत आला पंरतु खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने शेतकऱ्यांना आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने बाजारात हरभरा विकावा लागत आहे.
अकोला : रब्बी हंगामातील हरभरा हंगाम संपत आला पंरतु खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने शेतकऱ्यांना आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने बाजारात हरभरा विकावा लागत आहे.
यावर्षीच्या रब्बी हंगामातील हरभरा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून काढणीला सुरू वात झाली. आता जवळपास काढणी हंगाम संपला. ज्या शेतकऱ्यांनी उशीरा पेरणी केली तेथील हरभरा आता काढणीला आला.पण बाजरातील सरासरी दर प्रतिक्ंिवटल ३,९५० रू पये असून, आधारभूत किंमत प्रतिक्ंिवटल ४,६२० रू पये आहेत. तथापि आधारभूत किंमतीने खरेदी करण्यासाठी अद्याप शासकीय खरेदी केंद्रच सुरू केले नसल्याचे शेतकºयांची अडचन वाढली असून, त्यांना कमी दरात विक्री करावी लागत आहे.अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभºयाची दररोजची आवक सरासरी २,८०० क्ंिवटल आहे. दर वाढीच्या प्रतीक्षेत शेतकºयांनी हरभरा राखून ठेवला आहे.शासकीय तूर खरेदी संदर्भात बाजार समितीकडे अद्याप कोणतीच सुचना नाही अशी माहिती समितीचे सचिव सुनील मालोकार यांनी दिली.
दरम्यान, आॅनलाईन तूर नोंदणीसाठीची मुदत शासनाने २० मार्चपर्यंत वाढविल्याचे वृत्त आहे.कांदा अनुदानासाठीही आता ज्या शेतकºयांनी २८ फेब्रुवारीपर्यंत कांदा विकला ते अनुदानास पात्र राहणार असल्याचे पणन च्या सुत्राने सांगितले.