रेल्वेचे मासिक पास कधी सुरु होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:22 AM2021-09-24T04:22:22+5:302021-09-24T04:22:22+5:30

सध्या सुरु असलेल्या रेल्वे ०२१०५ मुंबई - गोंदिया ०२११ मुंबई - अमरावती ०१०३९ कोल्हापूर - गोंदिया ०२८०९ मुंबई - ...

When will the monthly train pass start? | रेल्वेचे मासिक पास कधी सुरु होणार?

रेल्वेचे मासिक पास कधी सुरु होणार?

Next

सध्या सुरु असलेल्या रेल्वे

०२१०५ मुंबई - गोंदिया

०२११ मुंबई - अमरावती

०१०३९ कोल्हापूर - गोंदिया

०२८०९ मुंबई - हावडा

०२१६९ मुंबई - नागपूर

०७७७४ अकोला - पूर्णा डेमू

०२८३३ अहमदाबाद - हावडा मुंबईत सवलत, आम्हाला का नाही?

मुंबईत कोरोनाची लाट ओसरल्याच्या पार्श्वभूमीवर लोकल सेवा सुरु झाली आहे. त्यामुळे चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या प्रवाशांना लोकलमध्ये मासिक पास सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याच धर्तीवर रेल्वेने सर्वच गाड्यांमध्ये मासिक पास सुविधा सुरु करावी, अशी मागणी होत आहे.

भुर्दंड किती दिवस सहन करायचा?

मी मुर्तीजापूर येथे खासगी फर्ममध्ये कामाला असून, दररोज अप-डाऊन करावे लागते. मासिक पासची सुविधा बंद असल्याने माझा प्रवास खर्च प्रचंड वाढला आहे. रेल्वेने किमान मासिक पास सवलत तरी पुन्हा सुरु केली पाहिजे.

- मंगेश सरकटे, प्रवासी

नोकरीनिमित्त दररोज शेगाव ते अकोला असा प्रवास करावा लागतो. पूर्वी मासिक पासची सुविधा होती, तेव्हा कमी खर्चात प्रवास होत असे. आता दररोज जास्तीचे पैसे मोजावे लागत आहे. हे आणखी किती दिवस चालणार?

- गजानन काळेे, प्रवासी

मुंबईतील लोकलप्रमाणे इतर गाड्यांमध्येही लसीचे दोन डोस झालेल्यांना पास सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे. पास नसल्याने माझ्यासारख्या दररोज प्रवास करावा लागणाऱ्यांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

- शीतल कुळकर्णी, प्रवासी

दोन्ही लस घेतलेल्यांना मुंबईत लोकलमधून प्रवास करताना पास सुविधा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. इतर गाड्यांमध्ये मात्र ही सुविधा अजून उपलब्ध नाही. याबाबतचा निर्णय सरकारच घेऊ शकते.

- जीवन चौधरी, जनसंपर्क अधिकारी, भुसावळ रेल्वे मंडळ

Web Title: When will the monthly train pass start?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.