कोरोना नसलेल्या अत्यवस्थ रुग्णांनी जायचे तरी कोठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:16 AM2021-04-26T04:16:30+5:302021-04-26T04:16:30+5:30
शहरातील शासकीय रुग्णालय - ०३ शासकीय कोविड हॉस्पिटल - ३ शहरातील एकूण खासगी रुग्णालये - ६० नॉनकोविडचे उपलब्ध बेड ...
शहरातील शासकीय रुग्णालय - ०३
शासकीय कोविड हॉस्पिटल - ३
शहरातील एकूण खासगी रुग्णालये - ६०
नॉनकोविडचे उपलब्ध बेड - ३००
कोविडवर उपचार सुरू असलेले खासगी रुग्णालये - २३
रोज ८ ते १० रुग्णांना जावे लागते परत
कोरोना वगळून इतर आजारावर उपचार करणाऱ्या रुग्णालयात खाटा शिल्लक नसल्याने दररोज अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल होण्यासाठी आलेल्या आठ ते दहा रुग्णांना परत पाठविण्याची वेळ आली आहे.
रुग्णांची गैरसोय
जिल्ह्यात ऑक्सिजनची कमी भासत आहे. अशा परिस्थितीत नॉनकोविडच्या रुग्णांनादेखील ऑक्सिजन उपलब्ध होत नाही. शिवाय, शस्त्रक्रियाही रखडल्याने अनेक रुग्णांची गैरसोय होत आहे.
१८ खासगी रुग्णालयात कोविडचे उपचार
शहरातील मोठ्या खासगी रुग्णालयांपैकी १८ खासगी रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ही शहरातील महत्त्वाची रुगणालये असून, या ठिकाणी जवळपास सर्वच खाटा कोविड रुग्णांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथे केवळ कोविडच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. इतर काही लहान मोठ्या रुग्णालयांमध्ये नॉनकोविडच्या रुग्णांवर उपचार सुरू असले, तरी त्या ठिकाणी ऑक्सिजनची कमी भासत आहे. त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी मोठी अडचण येत आहे. शिवाय, औषधांचाही तुटवडा भासत असल्याने रुग्णांची मोठी पंचाईत होत आहे. त्यामुळे अनेक रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच औषधोपचार घेत आहेत, मात्र त्यांचा आजार कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असून नॉनकोविडच्या गंभीर रुग्णांसाठीही रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे.
सर्वोपचार रुग्णालयात अत्यंत महत्त्वाचे असलेले स्त्री रोग, बालरोग, अस्थिरोग आणि औषधवैद्यक शास्त्र विभाग सुरू असून या ठिकाणी रुग्णांवर आवश्यक उपचार केला जात आहे.
- डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, विभागप्रमुख औषधवैद्यक शास्त्र, जीएमसी, अकोला