गृहविलगीकरणातील रुग्णांच्या घरातील कचरा जाताे कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:17 AM2021-04-14T04:17:13+5:302021-04-14T04:17:13+5:30

काेराेनाच्या वाढत्या प्रसारामुळे वैद्यकीय आराेग्य यंत्रणेवरचा ताण वाढला आहे. नागरिकांना साेशल डिस्टन्सिंगच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करताना प्रशासकीय यंत्रणांच्या ...

Where do household waste patients' household waste go? | गृहविलगीकरणातील रुग्णांच्या घरातील कचरा जाताे कुठे?

गृहविलगीकरणातील रुग्णांच्या घरातील कचरा जाताे कुठे?

Next

काेराेनाच्या वाढत्या प्रसारामुळे वैद्यकीय आराेग्य यंत्रणेवरचा ताण वाढला आहे. नागरिकांना साेशल डिस्टन्सिंगच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करताना प्रशासकीय यंत्रणांच्या नाकीनऊ आल्याची स्थिती आहे. तरीही नागरिकांकडून नियमावली पायदळी तुडविली जात आहे. घराबाहेर निघताना तसेच बाजारपेठेत साहित्य खरेदी करताना ताेंडाला मास्क लावणे, आपसात किमान चार फूट अंतर राखून संवाद साधणे, हाताला सतत सॅनिटायझर लावणे आदी नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे, तसे हाेत नसल्यामुळेच काेराेनाबाधितांच्या संख्येत वाढ हाेत आहे, अशास्थितीत काेराेनाच्या प्रसारासाठी गृहविलगीकरणातील रुग्णांच्या घरातून निघणारा कचराही पाेषक ठरत आहे. काेराेनाची लागण झालेल्या; परंतु उपचारानंतर घरात थांबणाऱ्या रुग्णांच्या वापरात आलेले साहित्य, मास्क, हातमाेजे, औषधीच्या बाटल्या आदी साहित्याची याेग्यरीत्या विल्हेवाट न लावता थेट सर्व्हिस लाइनमध्ये उघड्यावर, तसेच कचऱ्याचे ओला व सुका, असे वर्गीकरण न करता घंटागाडीत टाकल्या जात आहे़

कचऱ्यातून काेराेना पसरू शकताे का?

गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांनी त्यांच्या वापरात आलेल्या साहित्याची शास्त्राेक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे अपेक्षित आहे. मास्क, हातमाेजे व औषधींच्या रिकाम्या बाटल्या आदी उघड्यावर टाकणे आराेग्यासाठी घातक आहे. घंटागाडीमध्ये कचरा टाकण्यापूर्वी त्याचे ओला व सुका असे वर्गीकरण करणे नितांत गरजेचे आहे. काेराेनाबाधित रुग्णांनी घरी वावरताना खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे.

-डाॅ. अस्मिता पाठक, वैद्यकीय अधिकारी, मनपा

काेराेनाची लागण झालेल्या रुग्णांनी घरी वावरताना खबरदारी घेण्याची गरज आहे. दैनंदिन वापरात आलेल्या वस्तूंचे वर्गीकरण करून कचरा उघड्यावर न टाकता घंटागाडीत टाकण्याची जबाबदारी रुग्णांचीच आहे.

-प्रशांत राजूरकर, विभागप्रमुख, स्वच्छता व आराेग्य विभाग मनपा

कचरा एकत्र करणारे कर्मचारी

२४८

ओला, सुका कचरा

१४२ टन

शहरातील एकूण रुग्ण- १,८९८

बरे झालेले रुग्ण- १,७१०

उपचार घेत असलेले रुग्ण- १८८

गृहविलगीकरणातील रुग्ण- १,७१०

Web Title: Where do household waste patients' household waste go?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.